ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस "मराठी राजभाषा दिन" म्हणून साजरा करण्यात येतो .'अमृतातेही पैजा जिंकणाऱ्या', मायमराठीचा गौरव करण्याचा ,आपल्या मातृभाषेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस .
माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दऱ्याखोऱ्यातील शिळा
दि.२७ फेब्रुवारी २०२२ रोजी आमच्या शाळेत मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्ग स्तरावर पुस्तक परीक्षण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.प्रत्येक वर्गातून दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली सदर स्पर्धेचे नियोजन मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा बेडसे यांच्या मार्गदर्शनातून करण्यात आले .सदर स्पर्धेसाठी शालेय वाचन पेटीतील पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आली होती .उत्स्फूर्त प्रतिसादात स्पर्धा संपन्न झाली.वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी व विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा अभिमान निर्माण व्हावा या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
"राष्ट्रीय विज्ञान दिवस "
२८ फेब्रुवारी १९२८ मध्ये भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सी.व्ही.रमण यांनी रमन परिणामांचा शोध लावला तेव्हापासून २८ फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो.
भारतात शास्त्रीय ,शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात .
"श्रद्धे विना विज्ञानाला नाही गंध
विज्ञाना विना श्रद्धा ही अंध "
सोमवार दि.२८ फेब्रुवारी २०२२ रोजी आमच्या शाळेत इयत्ता ३री ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रयोग साहित्याची ओळख व परिचय त्याचप्रमाणे विविध प्रयोग करण्याची संधी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन देण्यात आली .त्याचप्रमाणे इयत्ता ७ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विज्ञानविषयक माहितीचे कात्रण संग्रह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .विज्ञान विषयात रुची निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा या दृष्टीने संपूर्ण उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.शाळा समिती सदस्या सौ.भिरुड मॅडम ह्या सदर प्रसंगी उपस्थित होत्या.मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा बेडसे यांच्या मार्गदर्शनातून संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.