राष्ट्रीय शिक्षण संस्था स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णूनगर (प्राथमिक) मातृदिनानिमित्त विशेष उपक्रम

14 Sep 2021 19:20:57
राष्ट्रीय शिक्षण संस्था
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णूनगर (प्राथमिक)  
 
मातृदिनानिमित्त विशेष उपक्रम

mothers day_1  
 
 
 
 
आई तुझ्या चरणी वैकुंठधाम
तूच माझा पांडुरंग |
आई उच्चरानेच होईल
सगळ्या वेदनांचा अंत...||
      व्रतवैकल्ये, सण, उत्सव आणि उत्साहाने भरलेल्या श्रावण महिन्याची सांगता होते"पिठोरी अमावास्येने".आई आणि मुलाचं नातं जपणारी पिठोरी अमावास्या म्हणजेच " मातृदिन ".संतती रक्षणासाठी ६४ देवतांच्या पूजनाबरोबरच स्त्रीला स्वतःच्या सामर्थ्याची व मर्यादाशीलतेची जाणीव पिठोरी अमावास्या करून देते.
आलेल्या प्रत्येक वेळेला हरवत आलीस
वंदन तुझ्या धाडसाला |
पुनर्जन्म घ्यावेत तुझ्याच पोटी
शत: नमन तुझ्या कष्टाला ||
         आई म्हणजे ममता, जिव्हाळा, जखमांचं औषध, देवीचं रूप, यातना,सहनशीलता, समर्पण आणि बरेच काही. आईचं ममत्व प्रत्येकाला कळतच .परंतु ;कोरोना काळात आई नव्याने उमगली. न थकता सर्वांसाठी धडपडणं हे आईच करू शकते.
. आईची भक्ती, बाबांची वृत्ती
आई - लढण्याची शक्ती
बाबा - जिंकण्याची नीती
आईचं ममत्व, बाबांचं अस्तित्व
ज्येष्ठांच्या आशीर्वादाने घडते कर्तृत्व ||
           याच जाणिवेने स्त्री - पुरुष समानता, वडीलधाऱ्यांविषयी आदरभाव व कृतज्ञता या भावना मनी जोपासत राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगर (प्राथमिक) शाळेने इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी " ज्येष्ठांचे औक्षण" या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले.
           सोमवार दिनांक ६ सप्टेंबर २०२१ रोजी मातृदिनाच्या निमित्ताने आभासी प्रणालीद्वारे उपक्रमाचे आयोजन केले. माता-पिता व घरातील सर्व ज्येष्ठांच्या औक्षणाच्या संस्मरणीय छायाचित्रांचे संकलन केले. या उपक्रमात पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
           माता , जननी , मातृभूमी आणि
           मातृभूमीतून धान्य उगवून देणाऱ्या
           बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी याच दिवशी बैलपोळ्याचा थाट केला जातो.
शिंगे रंगविली, बाशिंगे बांधली
चढविल्या झुली, ऐनेदार||
          मातृदिन , पोळा आणि बाल गोपाळांच्या पूजेचा मान म्हणजेच "पिठोरी अमावास्या".
         विद्यार्थ्यांमध्ये सर्वसमावेशकता व आदरभाव रुजवणारा हा उपक्रम, शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा बेडसे बाई यांचे मार्गदर्शन व सुनियोजन तसेच सर्व शिक्षक , पालक, सहभागी विद्यार्थी यांच्या सहकार्याने यशस्वी पार पडला.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0