राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर,माध्यमिक शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन
राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर,माध्यमिक शाळेने ७४ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आल्या.
सध्या कोरोनाचे सावट आहे.यामुळे शाळेने इयत्ता आठवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चित्रकला,वक्तृत्व स्पर्धा तसेच १५ ऑगस्ट निमित्त देशभक्तीपर गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी घरूनच स्पर्धामध्ये सहभाग घेतला.विद्यार्थ्यांनी वेगवेगळया विषयावरील चित्र, भाषणही शाळेच्या गटामध्ये पाठवले. यातून असे दिसून आले की, शाळा जरी ऑनलाईन असली तरी आपण शाळेशी जोडले गेलो आहोत ; ही भावना या विद्यार्थ्यांमध्ये होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले की आपण आहे त्या परिस्थितीवर मात केली पाहिजे, त्यातून मार्ग शोधला पाहिजे. स्पर्धांच्या आयोजनमुळे वेगळे वातावरण निर्माण झाले व आत्मविश्वास वाढला.
वक्तृत्व स्पर्धा निकाल -
प्रथम क्रमांक - सोहम विवेक ठोंबरे १० वी अ
द्वितीय क्रमांक - अनामिका अनिल निकम ८ वी ब
चित्रकला स्पर्धा निकाल-
अदिती निलेश अजनाडकर ९ वी क प्रथम क्रमांक
साक्षी संजय पाटील ९ वी ब द्वितीय क्रमांक
पारस चेतन फेडगे ९ वी क तृतीय क्रमांक
मोक्षा देवेंद्र चौधरी ८ वी अ प्रथम क्रमांक
जल्पिका कांतेश मुलगे ८ वी ब द्वितीय क्रमांक
ऋतुजा आनंद ठाकूर ८ वी क तृतीय क्रमांक
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर,माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. रायसिंग सर यांच्या मार्गदर्शनामध्ये शिक्षकांनी स्पर्धा घेतल्या.विद्यार्थ्यांनी स्पर्धेला उत्तम प्रतिसाद दिला.
बक्षिसपात्र विद्यार्थ्यांनी
काढलेली चित्रे,आणि
ऑनलाईन सादर
केलेली भाषणे,गायलेली देशभक्तीपर गीते खालील चित्रांमध्ये आणि व्हिडिओ मध्ये आहे.