राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवली संचालित ,स्वामी विवेकानंद विद्यामंदिर,विष्णुनगर (प्राथमिक) हिंदी दिवस

15 Sep 2020 20:17:16

         
हिंदी दिवस_1  H

                                                                                                                                            १४ सप्टेंबर २०२०
                                                                                                                                   

विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य वाढविण्यासाठी ऑनलाईन अभिनव उपक्रम


हिंदुस्थानी है हम, गर्व करो हिंदी पर ,

सन्मान देना, दिलाना कर्तव्य है हम पर |

खत्म हुआ विदेशी शासन,

अब तोडो बेडियो को

तह दिल से अपनाओ खुले आसमाँ को ,

पर ना छोडो धरती के प्यार को |

हिंदी है मातृतुल्य हमारी ,

इस पर न्योछावर करो जिंदगी सारी |

                     दरवर्षी १४ सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जातो.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यासाठी काका कालेलकर, मैथिलीशरण गुप्त, रामचंद्र शुक्ल, हजारी प्रसाद द्विवेदी, सेठ गोविंददास आणि राजेंद्र सिंह इत्यादी साहित्यिकांनी खूप प्रयत्न केले .१४ सप्टेंबर १९४९ ला संविधान सभेत सर्वांनी एकमताने हिंदी ही भारताची राजभाषा असेल असा निर्णय घेतला.तेव्हापासून दरवर्षी १४ सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो .
या दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना लक्षात यावे. म्हणून आमच्या शाळेत सोमवार,दि.१४ सप्टेंबर रोजी ऑनलाईन ह्या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हिंदी दिवस साजरा करण्यात आला .
सदर उपक्रमा अंतर्गत मुलांना संवाद लेखन करून तोच संवाद विद्यार्थी आणि त्यांच्या घरातील पालक दोघांत सादर करण्यासाठी सांगितले होते .या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना विविध विषय देण्यात आले होते.त्यात आज पर्यंत आपल्या महाराष्ट्रात देशात जे समाजसेवक भारत देशाच्या निर्मितीसाठी ज्या व्यक्तींनी योगदान दिले आपले संपूर्ण जीवन समाजोपयोगी समर्पित केले अशा सर्व थोर व्यक्तींचे चरित्र , ते ज्या क्षेत्रात काम करत होते त्या क्षेत्राविषयी त्यावर आधारित संवाद तयार करणे, त्याचप्रमाणे प्रदूषण ,निसर्गाचे रक्षण व संरक्षण ,जातीयवाद, स्रीभ्रूणहत्या ,करोना जनजागृती ,वृक्ष संवर्धन ,पाणी वाचवा इत्यादी अनेक विषय देण्यात आले होते.
सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संवाद लेखनासाठी प्रेरित केले.सदर उपक्रमाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचे हिंदी भाषेतील संभाषण कौशल्य वाढीस लागावे,हिंदी राष्ट्रभाषा असल्याचा त्यांना अभिमान वाटावा.तसेच समाजातील महत्त्वाच्या समस्यांवर जनजागृती व्हावी असे अनेक महत्त्वपूर्ण उद्देश डोळ्यासमोर ठेवून सदर उपक्रम राबण्यात आला. या उपक्रमात इयत्ता ते वी च्या विद्यार्थी पालकांनी सहभाग घेतला.
सदर उपक्रमास आमच्या शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा बेडसे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तसेच ह्या उपक्रमाचे संपूर्ण संयोजन शाळेतील शिक्षक श्री.कैलास माळी ह्यांनी केले शाळेतल्या सर्व शिक्षकांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी त्यांना सहकार्य केले.पालकांनी ह्या उपक्रमात उत्साहाने सहभागी होत ह्या उपक्रमाचे स्वागत केले. आमचे संस्था पदाधिकारी ,शाळा समिती सदस्य ह्यांनी "एक अभिनव उपक्रम"ह्या शब्दात या उपक्रमाची प्रशंसा केली.
प्रातिनिधिक स्वरूपात ह्या उपक्रमातील संवादाचे सादरीकरण पुढीलप्रमाणे............
Powered By Sangraha 9.0