इथेच काशी इथेच ईश्वरप्रेमळ आई अथांग सागरमाया ममता उदंड देते नाही जीवाला घोर माऊलीदेवाहून ही थोर

19 Aug 2020 17:22:57

 करूया मातेचे औक्षण_1 
भारतीय संस्कृतीत मातेला सर्वोच्च स्थानी मानले जाते. गौतम ऋषींचा पुत्र चिरकारी याने मातृमहात्म्य इंद्राला कथित केले होते त्यातून आईची महती प्रतित झालेली कळते.
नास्ति मातृसमा छाया
नास्ति मातृसमा गति:|
नास्ति मातृसमं त्राणम
नास्ति मातृसमा प्रिया ||
अशाच संस्काराची शिदोरी देणारी राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर प्राथमिक शाळेने मंगळवार ,दिनांक १८ ऑगस्ट २०२० रोजी साजरा केला....एक आगळावेगळा उपक्रम...
करूया आईचे औक्षण
आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती सुनंदा बेडसे बाई व सर्व शिक्षक वृंद यांच्या सह विचारातून इ.१ली ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी या मातृदिनी आपल्या मातेचे औक्षण करणे व तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. त्याप्रमाणे इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या आईला औक्षण केले तसेच जे विद्यार्थी गावी आहेत आईच्या संपर्कात नाहीत त्यांनी मातृतुल्य असणाऱ्या घरातील स्त्रियांना औक्षण केले.
तसेच आपल्या माऊलीचे महात्म्य शब्दांपेक्षा कृतीतून व्यक्त करणारा या उपक्रमात सहभाग घेतला इथे असणाऱ्या आणि गावी असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्याआई विषयी वाटणार्‍या भावना लेखनातून ,चित्रातून,स्वरचित कवितेतून ,इतर कवितेतून व्यक्त केल्या
कोरोनाच्या या काळात विद्यार्थ्यांनी घरी राहून साजरा केलेल्या या उपक्रमाचे छायाचित्रण वर्ग शिक्षकांकडे व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून पाठवले या उपक्रमाचे छायांकित सादरीकरण पुढीलप्रमाणे...
 
इथेच काशी इथेच ईश्वर,
प्रेमळ आई अथांग सागर
माया ममता उदंड देत
नाही जीवाला घोर
माऊली देवाहून ही थोर
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0