स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर प्राथमिक विभागातर्फे लोकमान्य टिळकांचे पुण्यस्मरण व आदरांजली
01 Aug 2020 19:06:00
"स्वराज्यहामाझाजन्मसिद्धहक्कआहेआणितोमीमिळवणारच "
अशी सिंहगर्जना करून देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात 'टिळक पर्व' सुरू करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक..!
१ ऑगस्ट ही टिळकांची पुण्यतिथी. कोरोनासारख्या वैश्विक महामारीतही आमच्या शाळेतील सुमारे २५०ते ३०० विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनचरित्राच्या आधारे गतस्मृतिंना उजाळा दिला. शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीमतीसुनंदा बेडसे बाई यांचे मार्गदर्शनपर नियोजन, सर्व शिक्षकांनी whatsappग्रुपवरील विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची अभ्यासपूर्ण मेहनत व पालकांचे सहकार्य ह्या सर्वांच्या समरसतेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे सर्वांनाच टिळक युगाचे समग्र दर्शन झाले.
ह्या उपक्रमाचे इयत्तांनुसार स्वरूप खालीलप्रमाणे होते.
इ. १ ली व २ री : उतारा पाठांतर (शब्दमर्यादा ५० ते ६०)
इ. ३ री व ४ थी : उतारा पाठांतर (शब्दमर्यादा १०० ते १२०)
इ. ५ वी ते ७ वी : वक्तृत्व सादरीकरण (वेळ ३ ते ५ मिनिटे)
अतिशय स्वयंस्फूर्तीने भाग घेऊन सर्वच विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांप्रती असलेला आदर व आदर्शाची संवेदना व्यक्त केल्या.
उपक्रमातील सादरीकरण प्रत्येक वर्गांच्या whatsapp ग्रुपवर टाकण्यात आले आहेत. त्यापैकी काही व्हिडीओजचे शेवटी प्रातिनिधिक स्वरूपात संकलन केले आहे.
लोकमान्य टिळक एक हाडाचे शिक्षक, समाजसुधारक भारतीय संस्कृतीचे उपासक, जहाल संघटक, निर्भिड पत्रकार, आदर्श राजकारणी, बलोपासक अशा विविध रूपात सर्वांसमोर शब्दांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उभे केले. टिळकांचे ह्या संदर्भातील विचार आजही अनुकरणीय आणि आचरणीयच आहेत. काळ बदलला, अजूनही बदलेल, नवनवीन आव्हाने, संकटेही येतील पण ह्या सर्वांवरही लीलया मात करणारी 'टिळकनीती' आजही टिकून आहे आणि असणारच आहे.