स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर माध्यमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

13 Dec 2019 22:33:12

स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर माध्यमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न

                  स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर माध्यमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शाळेच्या मैदानावर संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या माजी विद्यार्थी माननीय डॉक्टर गार्गी देशमुख मॅडम या उपस्थित होत्या. याचबरोबर व्यासपीठावर शाळा समिती अध्यक्ष माननीय डॉ. श्री.शरद धर्माधिकारी सर, शाळा समिती सदस्य माननीय श्री.रवींद्र जोशी सर, माननीय श्रीमती स्मिता तळेकर मॅडम , शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. भोजराज रायसिंग सर, पर्यवेक्षिका सौ. माननीय सुलभा बोंडे मॅडम होत्या.

                   यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्या माननीय डॉक्टर देशमुख मॅडम म्हणाल्या शाळेत असताना विविध स्पर्धांची बक्षिसे जिंकली याचबरोबर अभ्यासही केला. शाळेने शिस्त शिकवली याचा उपयोग पुढील आयुष्यात झाला. सध्याचे युग स्पर्धेचे असून यामध्ये दिवस-रात्र मेहनत घ्यावी लागते. याप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांनी मेहनत घ्यावी. शाळेतील तसेच शाळा बाहेरील स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहन दिले.

               शालेय समिती अध्यक्ष माननीय डॉ. श्री. धर्माधिकारी सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर मुख्याध्यापक माननीय श्री. रायसिंग सर यांनी गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीचा आढावा अहवाल वाचनातून घेतला.

             महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची मराठी संस्कृती यांच्या सुरेख समन्वयातून कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा मराठमोळ्या संस्कृतीचा हा कार्यक्रम नृत्य,नाट्य ,गायन, वादन यामधून इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी रसिकजनांच्या समोर सादर केला. यामध्ये भूपाळी ,जात्यावरच्या ओव्या, वासुदेव, जोगवा, गोंधळ, धनगर गीत ,लावणी,पंढरपूर महिमा, शिवराज्याभिषेक सोहळा, अफजलखान वधाचा पोवाडा, आरती विठ्ठलाची,कोकणातील पालखी नृत्य,जयोस्तुते असे विविधांगी कार्यक्रम सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे परीक्षण माजी मुख्याध्यापिका माननीय सौ दिपाली काळे मॅडम व माजी शिक्षिका माननीय सौ भाग्यलक्ष्मी पडसलगीकर मॅडम यांनी केले .

              संस्थाध्यक्ष माननीय डॉ.सुभाष वाघमारे सर,कार्यवाह माननीय डॉक्टर श्री. दीपकजी कुलकर्णी ,संस्थेचे स्नेहसंमेलन प्रमुख माननीय श्री. विद्याधर शास्त्री,संस्था सदस्य माननीय श्री. नरेंद्र दांडेकर उपस्थित होते.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री. सुनील पांचाळ सर व शिक्षिका सौ. भाग्यश्री दातार मॅडम यांनी केले तर आभार श्री. धनराज सपकाळे सर यांनी मानले.
1_1  H x W: 0 x
1_1  H x W: 0 x


1_1  H x W: 0 x


1_1  H x W: 0 x

1_1  H x W: 0 x
1_1  H x W: 0 x
1_1  H x W: 0 x
1_1  H x W: 0 x
1_1  H x W: 0 x
1_1  H x W: 0 x

 
 
 
Powered By Sangraha 9.0