विज्ञान प्रदर्शन

28 Nov 2019 13:26:20



 
  ज्ञान विज्ञानातुनी ये  
सत्य आता प्रत्ययाला
थोर या ज्ञानी जनांचा
वारसा आम्हा मिळाला 
 
               त्या थोर  ज्ञानी   जनांपैकी एक म्हणजे सर्वश्रेष्ठ भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन. त्यांच्या स्मृतिदिनी म्हणजे गुरुवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी स्वामी विवेकानंद विद्या मंदिर विष्णुनगर प्राथमिकच्या बालवैज्ञानिकांनी विज्ञान प्रदर्शनातून त्यांना आदरांजली वाहिली. विज्ञान प्रदर्शनाचे  उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका मा  श्रीमती  सुनंदा बेडसेबाई, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका शिक्षण  शिक्षण विभागातर्फे दिव्यांग मुलांना प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक सौ. प्रिया मिरगळ, शालेयसमिती सदस्य श्री.रवींद्र जोशी तसेच परीक्षक म्हणून अरुणोदय प्राथमिक शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. सुनित वारके, दत्तनगर प्राथमिक शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. भावना राठोड यांच्या हस्ते झाले. विज्ञान प्रदर्शनात इयत्ता तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी जवळ्जवळ नव्वद प्रयोगांची मांडणी केली होती.  प्रदुषण, कचरा व्यवस्थापन, शेती, ऊर्जा, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी अनेक विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रयोग सादर केले. यापैकी इयत्ता सातवी अ मधील  श्रीसाय नेहतेकार्तिकेय घरटे या दोन विद्यार्थ्यांनी भारतीय जवानांच्या सुरक्षिततेसाठी  बनवलेला रोबोट” प्रदर्शनाचे आकर्षण बिंदू ठरला. विद्यार्थ्यांनी केलेली मांडणी त्यामागे स्पष्ट केलेली वैज्ञानिक तत्व, आत्मविश्वास याचे परीक्षकांनी भरपूर कौतुक केले. पालकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनास भेट दिली. साध्या सोप्या आणि स्वतः तयार केलेल्या साधनांच्या उपकरणांच्या प्रदर्शनीय वस्तूंच्या निर्मितीतून विधायक विचार आणि संशोधन प्रवृत्तींचा विकास होणे ;विज्ञानाचा समाजाशी असलेला सहसंबंध विद्यार्थ्यांच्या लक्षात येणे इत्यादी विज्ञानाची उद्दिष्टांची यशपूर्ती या विज्ञानप्रदर्शनातून झाली याचे समाधान मुख्याध्यापकांनी व्यक्त केले.


विश्वसंचारास आता आपणांला लाभलेले
मानवाचे हात आता ते ग्रहांशी पोचलेले
सिद्ध आम्हीही नवे आव्हान हे पेलावयाला
संपला अंधार आता सूर्य ज्ञानाचा उदेला

 









         
Powered By Sangraha 9.0