माझा बाप्पा

Source :    Date :17-Sep-2021
 
 
lokmanyatilak_1 &nbs
 
 वक्रतुंड महाकाय
सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नम  कुरु मे देव
सर्व कार्येषु सर्वदा '।
कोणत्याही कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजनाने होते . अशा विघ्नहर्त्या विनायकाचा उत्सव म्हणजेच
                                                            ' गणेशोत्सव ' .
घराघरात साजरा होणारा गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्राचे वैभवच .अशावेळी या उत्सवाच्या उत्साहात भर घालण्यासाठी आमच्या बालगोपाळांनी गणेशाची विविध रूपे साकार केली .
इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध वस्तूंपासून गणेशाची मनोहर रूपे साकारली .
इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी शाडूच्या मातीपासून गणेशाच्या मूर्ती बनवल्या .
विद्यार्थ्यांच्या अमूर्त संकल्पनेतून मूर्त बाप्पा साकारलेला पाहताना तुम्हालाही नक्कीच आनंद होईल .
या सर्व उपक्रमासाठी पालकांचा नेहमीप्रमाणे सक्रिय सहभाग लाभला .
विद्यार्थ्यांच्या या  गणेशोत्सव पर्यावरण पूरक उपक्रमाचे शाळेच्या सन्माननीय मुख्या . श्रीम.सुनंदा बेडसे  यांनी कौतुक केले .