राष्ट्रीय शिक्षण संस्था स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णूनगर (प्राथमिक)हिंदी दिवस
Source : Date :17-Sep-2021
राष्ट्रीय शिक्षण संस्था
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णूनगर (प्राथमिक)
हिंदी दिवस
संस्कृत की एक लाडली बेटी है ये हिन्दी ।
बहनों को साथ लेकर चलती है ये हिन्दी ।
सुंदर है, मनोरम है, मीठी है, सरल है ,
ओजस्विनीव है और अनूठी है ये हिन्दी ।
कोणत्याही देशाची ओळख ही त्याची राष्ट्रभाषा ,राष्ट्रध्वज आणि त्या देशाच्या संस्कृतीवर होत असते .स्वातंत्र्यप्राप्तीनंतर घटना समितीने १४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदी भाषेला राष्ट्रभाषा म्हणून घोषित केले.तेव्हापासून १४ सप्टेंबर हा दिन हिंदी राष्ट्रभाषदिवस म्हणून साजरा केला जातो .
इंग्रजी भाषेचे प्रभुत्व वाढत असताना एकमेकांशी संवादाच्या दृष्टीने हिंदी भाषेचे महत्त्व अबाधित आहे .
राष्ट्रीय स्तरावर हिंदी भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन आमच्या शाळेमध्ये सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती बेडसे बाई यांच्या मार्गदर्शनातून इयत्ता ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त हिंदी कवितांचे गायन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी तयारी केली .पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी कविता सादरीकरण चा व्हिडिओ तयार केला.हिंदी भाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण व्हावी .व हिंदी कवितांचे रसग्रहण व्हावे या दृष्टीने १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवसाचे औचित्य साधून उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .सदर उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कोरोना ची पार्श्वभूमी असल्याने सदर उपक्रम आभासी प्रणाली या माध्यमातून घेण्यात आला.