ओम् नमो विघ्नराजाय सर्व सौख्य प्रदायिनेदुष्ट अरिष्ट विनाशाय पराय परमात्मने ll

Source :    Date :30-Aug-2020
 
गणाधीश जो ईश सर्वां गुणां
ओम् नमो विघ्नराजाय सर्व सौख्य प्रदायिने
दुष्ट अरिष्ट विनाशाय पराय परमात्मने ll
दुष्ट अरिष्टांचा नाश करणारा जो परात्पर परमात्मा अशा श्री गणेशाला नम्र नमस्कार.   
  एके काळी जनजागृतीच्या उद्देशाने सुरू झालेला सार्वजनिक श्री गणेशोत्सव आज देश-विदेशात वेगवेगळ्या रूबाबात,उत्साहात आणि अत्यंत जल्लोषात साजरा केला जातो.
उकडीच्या मोदकाला केवळ पीठ आणि सारणाने गोडवा येत नाही.त्याला गोडवा प्राप्त होतो तो त्याला दिल्या जाणा-या आचेमुळे.असाच गोडवा आणि प्रसन्नता मानवी देहामध्ये निर्माण होण्यासाठी त्याच्या अहंकारी मनाला आच मिळावी म्हणून समर्थांनी २०५ श्री मनाचे श्लोक लिहिले.आणि त्यातही सर्वांत पहिला श्लोक लिहिला--
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा l
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा l
नमू शारदा मूळ चत्वार वाचा l
गमू पंथ आनंत या राघवाचा ll
श्री गणेश मूर्ती पहाताक्षणीच मन भरून येतं.देहामध्ये प्रसन्नता निर्माण होते.आणि या प्रसन्नतेमुळेच माणसाला प्राप्त होतो तो पराकोटीचा आनंद-परमानंद!
सध्या कोरोनाच्या या संकट काळात मनाची स्थिती डळमळीत होऊ नये,कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरे जाण्यासाठी मनामध्ये चैतन्य हवे,स्फूर्ती हवी.
त्यासाठी सतत सगळीकडे सैरभैर फिरणारं आपलं मानवी मन त्या निर्गुण,निराकारी,१४ विद्या अन् ६४ कलांचा अधिपती असलेल्या श्री गणेशाच्या -बाप्पाच्या चरणी सदैव तल्लीन रहावं,त्यानेच निर्माण केलेल्या या देहामध्ये,निरागस बालमनामध्ये त्याचं सोज्वळ अन् मांगल्य स्वरूप भरून रहावं याच उद्देशाने प्रेरीत होऊन राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर,विष्णुनगर प्राथमिक शाळेतील सन्माननीय मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा बेडसे बाई यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वृंदासोबत झालेल्या चर्चेतून साकार झाली इको फ्रेंडली गणेश मुर्ती संकल्पना.
विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला भरपूर वाव देणारी इको फ्रेंडली श्री गणेशमूर्तीची किंवा इको फ्रेंडली सजावटीची संकल्पना--
                                                        एक मनमुराद आनंददायी उपक्रम!
खरोखरंच शाळेतील इयत्ता १ली ते ७वी ची बालमनं या उपक्रमामध्ये अगदी तल्लीन झाली,रममाण झाली आणि बाप्पामध्ये लीन झाली.
सदर सुप्रसन्न उपक्रमाचे छायांकित सादरीकरण पुढीलप्रमाणे----

नमामि ते गजाननं अनन्त मोद दायकम्
समस्त विघ्न हारकं समस्त अध विनाशकम्
मुदाकरं सुखाकरं ममप्रिय गणाधिपम्
नमामि ते विनायकं ह्रद कमल निवासिनम् ll