स्वातंत्र्याच्या शिखरावरतीडौलत राहो अभिमानाने तिरंगाच आहे शान आमुची मानवंदना तयाला सन्मानाची!!

Source :    Date :16-Aug-2020
 

तिरंगाच आहे शान आमुची_1&n
 
 
स्वातंत्र्याच्या शिखरावरती
डौलत राहो अभिमानाने
   तिरंगाच आहे शान आमुची
 मानवंदना तयाला सन्मानाची!!
 
   १५ ऑगस्ट  आमच्या प्रिय भारताचा आणि समस्त भारतीयांसाठी अतिशय पवित्र आणि संस्मरणीय असा दिवस.
भारताचा स्वातंत्र्यदिन   ७३ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीच्या शृंखला तोडून मुक्त झाला. लाखो देशभक्तानी अनेक मार्गांनी दिलेल्या लढ्यातून आपले स्वातंत्र्याचे स्वप्न पूर्ण झाले.
या भारतभूमीला स्वतंत्र करण्यासाठी तळहाती प्राण घेऊन लढणाऱ्या त्या लाखो महान वीरांना आमचे कोटी कोटी प्रणाम.
      राष्ट्रीयत्वाचे बीज घेऊन रुजलेल्या आमच्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या मुख्यालयी म्हणजेच स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर या शाळेत आज संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, संस्था संचालित  सर्व शाळांच्या मुख्याध्यापिका यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय  डॉ . श्री. सुभाषजी वाघमारे सर यांनी तिरंगा फडकवून ध्वजास मानवंदना दिली..
   आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिन साजरा केला तो उपक्रमाच्या माध्यमातून.

   दरवर्षी आजच्या दिनी सकाळपासूनच ओसंडून वाहणारा आनंद, उत्साह, ती लगबग, देशभक्तीपर गाण्याचे उत्तमोत्तम सादरीकरण हे सारे काही या वर्षीही आठवत होते. शाळेत येऊ शकत नसलो, तरी या आठवणींना चित्रबद्ध करायचे असे आम्ही शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ठरविले.
   शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा बेडसे यांच्या मार्गदर्शनाने इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी तिरंगी ध्वजाचे चित्र काढावे. इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी ध्वजारोह  कार्यक्रमाचे स्मरण चित्र काढावे आणि देशभक्तीपर गीत गायन करावे. हा उपक्रम घेण्यात आला. पालकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे फोटो आणि गायनाचे व्हिडिओ वर्गशिक्षकांनी संकलित केले.
       विद्यार्थ्यांची चित्ररूपी आणि सुरमयी अभिव्यक्ती पाहताना आपापल्या सदनी असलेल्या देहातलं मन अलगद शाळेच्या प्रांगणात उतरलं आणि नकळत ध्वजाला सलामी देताना आम्हा शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मनी भाव उमटले....
डौलाने फडकतो तिरंगा मनामनास देतो स्फूर्ती
विश्वात निनादत राहो
प्रिय भारतभूची कीर्ती
प्रिय भारतभूची कीर्ती !!
वंदे मातरम !!! वंदे मातरम!!!