अभिव्यक्तीचे माध्यम आहे नृत्य अन गायन
ऋजुता आणि अस्मिततेचे घडते त्यात दर्शन
वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थी रुपी जीवनात बहरू आलेल्या विविध कलेचे सादरीकरण करण्याचे व्यासपीठ.
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णूनगर प्राथमिक या शाळेत बुधवार दिनांक 11 डिसेंबर 2019 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दोन सत्रात आयोजित केलेल्या या संमेलनात सकाळ सत्रातील प्रमुख पाहुणे मा.श्री.केतन पटवर्धन व संध्याकाळच्या सत्रातील प्रमुख पाहुणे मा.श्री.हेमंत पाटील या दोन्ही माजी विद्यार्थ्यांनी शोभा वाढवली.
प्रस्तुत कार्यक्रमास संस्थाध्यक्ष मा. डॉ.श्री.सुभाष वाघमारे,कार्यवाह मा. डॉ.श्री दीपक कुलकर्णी, , संस्थेचे स्नेहसंमेलन प्रमुख श्री विद्याधर शास्त्री,संस्थासदस्य मा. श्री नरेंद्र दांडेकर, शाळासमिती अध्यक्ष मा.श्री शरद धर्माधिकारी,शाळा समिती सदस्य मा.श्री रवींद्र जोशी, मा.श्रीमती स्मिता तळेकर या सर्वांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले
शाळेच्या मा. मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा बेडसे यांनी आखलेल्या सुनियोजित कार्यक्रमाचा आस्वाद इयत्ता पहिली ते सातवी चे विद्यार्थी व त्यांच्या पालकांनीही घेतला. यामध्ये भूपाळी,भारुड,गोफनृत्य, बहीण-भाऊच्या नात्यावर आधारित गाण्यांची गुंफण,माता जिजाबाई व शिवाजी राजे यांच्या जीवनातील प्रसंग.शिवरायांच्या जीवनावरील प्रसंग, कृष्ण -सुदामा भेट,सैनिकांना समर्पित मुकाभिनय,विविधतेत एकता या विविध विषयावर आधारित नृत्याविष्कारातून शिक्षणाचे महत्त्व, स्वच्छता,शेतकऱ्याप्रति कृतज्ञता, देशप्रेम असे अनेक विषय विद्यार्थ्यांनी खूप छान रित्या मांडले. सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मा. श्री विद्याधर शास्त्री आणि सदर कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून आलेल्या माजी मुख्याध्यापिका मा.सौ दिपाली काळे माजी शिक्षिका मा.सौ भाग्यलक्ष्मी पडसलगीकर यांनी मा. मुख्याध्यापिका,सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रम चालू असताना आणि संपल्यावर पालकांनी खूप छान आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या. विद्यार्थ्यांवर संस्कार होईल असे उद्दिष्ट मनात ठेवूनच या बहारदार स्नेहसंमेलनाची सांगता कु.योजना कोळंबे हिने गायलेल्या संपूर्ण वंदे मातरम ने करण्यात आली.