स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगर प्राथमिक

Source :    Date :04-Jan-2020
 
 
          बालिका दिन _1  
 
या  ओठांनी सदैव गावी  सावित्रीची गाणी 
तिच्या प्रयत्ने आम्हा लाभली अमृताची वाणी  
              स्वामी  विवेकानंद विद्यामंदिर , विष्णुनगर  प्राथमिक या शाळेत  साजरा झाला पहिल्या  महिला शिक्षिका मुख्याध्यापिका सर्वाना पूजनीय ,वंदनीय अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी हा जन्म दिवस.
त्याच्या जयंती निमित्त ३ जानेवारी  हा  "बालिका दिन" म्हणून साजरा केला जातो.  
स्वामी  विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर  प्राथमिक या शाळेत शुक्रवार  दि. ३ जानेवारी २०२० रोजी बालिका दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा बेडसे बाई व वरिष्ठ शिक्षक  श्री. पेडामकर सर यांच्या हस्ते करण्यात आले . वरिष्ठ शिक्षिका सौ. रेखा महाजन यांनी बालिकादिना निमित्त सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती सांगितली. तसेच  विद्यार्थ्यांना गीत ऐकवले.
इ. ६ वीच्या  संस्था स्तरीय उपक्रम प्रश्न मंजुषा हा कार्यक्रम मा. मुख्याध्यापिका बेडसे बाई यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.  विद्यार्थ्यांना "भारतीय महिला " हा विषय देण्यात आला होता . त्यानुसार विद्यार्थ्यांचे गट करून प्रश्न मंजुषा घेण्यात आली. या प्रश्नमंजुषेच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना भारतीय महिलांनी केलेल्या सामाजिक ,शैक्षणिक कार्याविषयी  माहिती झाली.  प्रश्नमंजुषेचे परीक्षक म्हणून  श्री. शिवाजी हुलवळे ,सौ. वर्षा पाटील , सौ. सुनिता पाटील यांनी काम पाहिले .  
                                                        वंदन तिजला करू या सारे कर जोडुनी आता 
                                                       तिच्याच चरणी झुकत राहो माझा तुमचा माथा 

 बालिका दिन _1