कलाही कलात्मकतेला फुलवते ;
सृजनशीलतेला खुलवते
राष्ट्रीय शिक्षण संस्था आयोजित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेच्या सर्व शाखांमधून सन 2019 20 या शैक्षणिक वर्षात आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे एकोणिसावे वर्ष मोठ्या दिमाखात व उत्साहपूर्ण वातावरणात डॉ. हेडगेवार सभागृहात संपन्न झाला.
प्रस्तुत कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी राष्ट्रीय शिक्षण संस्था अध्यक्ष मा. डॉ. श्री. सुभाष वाघमारे, संस्था सदस्य मा.
श्री. विद्याधर शास्त्री ,संस्था सदस्य मा. श्री. अरुण ऐतावडे, संस्था सदस्य मा. सौ. माधवी कुलकर्णी,प्रमुख मा. श्री. अभय कुलकर्णी आणि आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे परीक्षक मा. श्री. किशोर गंधेरे { माजी विद्यार्थी } ,मा. श्री. परेश जाधव ,मा. श्री. पराग राणे, मा. श्री. गौरव गोगरकर { माजी विद्यार्थी },मा. श्री. सुनिल सूर्यवंशी ,मा. सौ. निलिमा यादव, मा. सौ. प्राची किल्लेकर, मा. कु.समृद्धी कुलकर्णी { माजी विद्यार्थी } हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
संस्थेतील कलाशिक्षकांनी साकारलेल्या पडद्यावरील सुंदर कलाकृतीचे अनावरण संस्थाध्यक्ष मा. श्री. सुभाष वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व परीक्षकांचे तुळशी रोप आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
“अभ्यासाबरोबरच चित्रकला छंद जोपासावा. चित्रकला चांगली असेल तर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो ” असा कानमंत्र उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मा. सौ प्राची किल्लेकर यांनी आपल्या मनोगतातून दिला.
संस्थाध्यक्ष मा. श्री. सुभाष वाघमारे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून “कृतीतून मिळते ते खरे शिक्षण होय.” असे सांगितले
इयत्तेनुसार गट क्र. १ ते ६ मध्ये विद्यार्थ्यांची विभागणी करण्यात आली. गट क्र .१ ते ६ मधील , ,विद्यार्थ्यांनी कोंबडा, किटली,मासा ,फुलपाखरू ,पिशवीवरील नक्षीकाम, फळांची टोपली ,माझा आवडता सण,हातपंखयावरील नक्षी ,माझा वाढदिवस,चांद्रयान (अक्षरलेखन) ,कापडी पिशवी रंगविणे अश्या विविध विषयांवर सुंदर चित्र काढले विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रकलेतून परीक्षकांना ही मुग्ध केले. प्रत्येक गटातील उत्तम अश्या तीन चित्रांची निवड करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विष्णुनगर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा बेडसे यांनी केले.
कलात्मक अशी ही सुंदर सकाळ विद्यार्थ्यांनी काढलेल्या सुंदर चित्रांनी सजली.