.. बालपण हे फुलपाखरासारखं ...
नाजूक आणि मोहक असतं....
आकाशातल्या इंद्रधनुष्यासारखं .....
निर्मळ आनंदाचे देत असतं ...
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ,विष्णुनगर प्राथमिक शाळेत १४ नोव्हेंबरची सकाळ फुलली
. ती अशाच रंगीबेरंगी फुलपाखरांनी निमित्त होते " बालदिनाचे"
भारताच्या प्रदीर्घ स्वातंत्र्यलढ्यानंतरचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. बालकांविषयी चाचा नेहरूंना वाटणाऱ्या प्रेमाची आठवण म्हणून १४ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस आपल्या देशात बालदिनाच्या रूपाने साजराकेला जातो
मुलं ही देवाघरची फुलं "या भारतीय संस्कृतीच्या संस्काराने आमच्या शाळेत उत्साही वातावरणात बालदिन साजरा झाला सर्वप्रथमशाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती बेडसे व स्पर्धेसाठी आलेल्या परीक्षकांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
बालदिनानिमित्त मुलांची आवड निवड लक्षात घेऊन व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल ह्या उद्दिष्टांनी शाळेत इ. १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा व इ . ५ वी ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे .ह्या स्पर्धा घेण्यात आल्या कुणी भाजीवाली , कुणी परी , कुणी नेता कुणी पोलीस तर कुणी टि .व्ही .अश्या विविध वेशभूषा विद्यार्थ्यांनी सादर केल्या . तर मोठ्या मुलांनी फुलदाणी, पेन स्टॅन्ड ,चटई ,पायपुसणी आणि उपयुक्त वस्तू बनवून त्याचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
.या स्पर्धांचे परीक्षण श्रीमती विचारे , सौ . भामरे ,सौ.डोंगरे , सौ . मुरादे , सौ. चिपळूणकर सौ. दहितुले यांनी केले.
एक ... दोन... साडे माडे तीन ....
खुलला हा बालदिन