स्वामी विवेकानंद विद्य़ामंदिर विष्णुनगर दीपोत्सव २०१९
मंगळवार दिनांक २२/१०/२०१९ रोजी स्वामी विवेकानंद विद्य़ामंदिर विष्णुनगर शाळेत दीपोत्सव साजरा करण्यात आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेच्या परिसरामध्ये रांगोळी, पणत्या लावून सजावट केली होती. त्यामुळे शाळेचा सर्व परिसर उजळून निघाला होता. दिवाळी हा दिव्यांचा, तेजाचा, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा उत्सव आहे आणि आपल्या अवतीभवती दु:खाचा, दुरिताचा, दुर्मुखतेचा लवलेशही शिल्लक राहता कामा नये. दिव्याचं प्रतीक असलेली ही इवलीशी पणती समाजातल्या प्रत्येक घटकाला आपलंसं करून प्रत्येकाला समसमानच प्रकाश देते.या दीपोत्सवाच्या कार्यक्रमास राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सहकार्यवाह माननीय श्री. प्रमोदजी उंटवाले सर , राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सदस्य माननीय श्री. रविंद्रजी जोशी सर , शिक्षण संस्थेचे सदस्य माननीय श्री. अरुणजी ऎतवडॆ सर यांनी भेट देऊन विद्यार्थी, शिक्षकांना दीवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
“सप्तरंगात न्हाऊन आली ,
आली माझ्या घरी ही दिवाळी….!!”
अशीच सप्तरंगात न्हाऊन ही आनंदाची दिवाळी – दीपोत्सव २०१९ आमच्या स्वामी विवेकानंद विद्य़ामंदिर विष्णुनगर शाळेत आली …..!!
दिवाळी हा मांगल्याचा ,पावित्र्याचा ,उत्साहाचा ,ऊर्जेचा आणि आनंदाचा सण ,अंधकारावर प्रकाशाच्या विजयाचा सण ,अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचा सण हा सण साजरा करत असताना आम्ही सुद्धा आमच्या विष्णुनगर शाळेत पणत्या पेटवून दीपोत्सव २०१९ साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.