वाचन प्रेरणा दिवस दि. १५ ऑक्टोबर २०१९

Source :    Date :19-Oct-2019
  
   स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर शाळेत  साजरा झाला वाचन प्रेरणा दिन
 "वाचन संस्कृती घरोघरी ,तिथे फुले ज्ञानाची पंढरी "
"वाचन प्रेरणा दिवस" 
          माजी राष्ट्रपती स्व. ए .पी. जे .अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दि. १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिवस" साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयास अनुसरून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी व वाचनाची आवड वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने आमच्या शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शाळेतील मुख्याध्यापिका मा.श्रीमती सुनंदा बेडसे यांनी स्व. ए.पी जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन केले.त्यावेळी शाळेतील इ.१ ली ते ७ वी चे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थी व शिक्षक यांना मार्गदर्शन करताना वाचन प्रेरणा दिन आपण का साजरा करतो? या प्रश्नाच्या उत्तराबरोबरच डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू त्यांनी उलगडले. डॉ. कलाम यांचे लेखन स्फूर्तिदायी आहे. विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम यांची पुस्तके वाचावीत त्याच बरोबर इतर साहित्याचेही जास्तीत जास्त वाचन करावे. यातूनच वाचनाची आवड जोपासावी. त्याच प्रमाणे इयत्ता ३ री ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी वाचन पेटीतील पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले. सदर उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने व उत्साहाने सहभाग घेतला. 
 " वाचाल तर वाचाल"