राष्ट्रीय शिक्षण संस्था स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर शाळेत १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Source :    Date :19-Oct-2019
राष्ट्रीय शिक्षण संस्था स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर शाळेत १५ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
                राष्ट्रीय शिक्षण संस्था स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर शाळेत राष्ट्रीय सण  १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे कार्यवाह माननीय श्री. दिपकजी कुलकर्णी सर ,प्रमुख   पाहुणे  राष्ट्रीय  शिक्षण  संस्थेचे  सदस्य आणि शालेय समिती सदस्य माननीय श्री. रानडे सर , संस्थेचे इतर पदाधिकारी,  माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक मा. रायसिंग   सर, पर्यवेक्षिका  मा.बोंडे मॅडम, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका  बेडसे  मॅडम, आजी-माजी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, सायकलपटू, पालक, नागरिक आणि प्राथमिक माध्यमिक शाळेचे विद्यार्थी हजर होते.
               कार्यक्रमाचे  प्रास्ताविक श्री. सपकाळे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. हिवाळे सर यांनी केले. ध्वजारोहन राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सदस्य आणि शालेय समिती सदस्य माननीय श्री. रानडे सर यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहणा नंतर ध्वज सलामी देण्यात आली. राष्ट्रगीत, ध्वजगीत झाल्यावर माननीय मुख्याध्यापक श्री. रायसिंग सर यांनी सर्व उपस्थितांना ध्वजप्रतिज्ञा दिली. त्यानंतर तीन कौमी नारे देण्यात आले.
               माजी विद्यार्थी संघाने शिक्षकांसाठी घेतलेल्या निबंध स्पर्धेत प्रथम, द्वितीय क्रमांकांना प्रमुख पाहुणे माननीय श्री. रानडे सर यांच्या  हस्ते  बक्षिसे  देण्यात  आली. त्यामध्ये माध्यमिक विभागातून श्री. पांचाळ सर प्रथम क्रमांक तर सौ. स्नेहल फडके, सौ. मगर मॅडम यांना द्वितीय क्रमांकाचे विभागून पारितोषिक देण्यात आले. प्राथमिक विभागातून सौ. भूमिका महाजन प्रथम क्रमांकाचे तर सौ. मानसी पवार यांना द्वितीय क्रमांकाचे  पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण माजी शिक्षिका श्रीमती वैशाली पाटील व माजी विद्यार्थी श्री. शेखर जोशी यांनी केले होते.
               सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये माध्यमिक व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. त्यातील सातवीच्या  विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीताला डोंबिवली जिमखाना स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त झाला होता. सांस्कृतिक कार्यक्रमा नंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला आणि कार्यक्रमाची सांगता झाली. अशा प्रकारे आमच्या विष्णुनगर शाळेत देशाचा ७३ वास्वातंत्र्य दिन अतिशय उत्साहात  साजरा करण्यात आला .