"आंतरराष्ट्रीय योग दिन " २१ जून २०१९

Source :    Date :16-Oct-2019
"आंतरराष्ट्रीय  योग दिन " 
  २१ जून २०१९ 
 
             "योग" भारताच्या प्राचीन परंपरेतील एक अमूल्य भेट आहे. हे मन आणि शरीराची एकता  निर्माण करते,विचार आणि कृती,संयम आणि पूर्णता ;मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील सौहार्द ,आरोग्य आणि कल्याणासाठी समग्र दृष्टिकोन निर्माण करते. हे व्यायामाबद्दल नाही स्वतःबरोबर,जगाबद्दल आणि निसर्गाशी एकतेची भावना शोधते. आपली जीवनशैली बदलून आणि चेतना तयार करून हवामान बदलास तोंड देण्यात ती आपल्याला मदत करते.आणि हाच समग्र दृष्टिकोन ठेवून स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ,विष्णूनगर प्राथमिक शाळेत शुक्रवार दि. २१ जून २०१९ रोजी "आंतरराष्ट्रीय योग दिन "साजरा करण्यात आला.  या वर्षी शाळेने  " श्री. अंबिका योग निकेतन ,ठाणे :या संस्थेतील डोंबिवली शाखेतील योगसाधक श्री. सुभाष चव्हाण, श्री.हेमंत पंडित, श्री. दीपक तिर्लोटकर  या साधकांना निमंत्रित केले . या साधकांनी  विद्यार्थ्यांना योग ही साधना आहे. तिचे साधक बना .ही तुमच्या भविष्याची गुरुकिल्ली ठरेल. असे महत्व पटवून दिले.  प्राणायाम ,पद्मासन ,बद्धपद्मासन ,ताडासन ,वृक्षासन, धनुरासन  त्याचबरोबर सूर्यमंत्र घोषासहित  सूर्यनमस्कार इ . चे प्रात्यक्षिक इयत्ता १ ली ते ७ वी च्या  सुमारे ११०० विद्यार्थ्यांनी सादर केले.  हा उपक्रम  २१ जून साठी मर्यादित  न राहता रोजच्या परिपाठात विद्यार्थ्यांकडून प्राणायाम  व ओमकाराचे आवर्तन करून घेतले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मन केंद्रित होते,,अभ्यासपूरक  वातावरण निर्मिती होते.  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेने राबवलेल्या या उपक्रमाविषयी पालकांकडून ही सकारात्मक प्रतिक्रिया  मिळत आहेत. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ,विष्णुनगर  शाळेचे आंतरराष्ट्रीय योगदिनाचे सादरीकरण शाळेच्या इ. ५ वी . ते ७ वी .च्या ११०० विद्यार्थ्यांनी २१जुने २०१९ रोजी  योग दिनानिमित्त   विविध आसन व सूर्यनमस्काराचे केलेले  अप्रतिम सादरीकरण ...