उपवासाची सुखांतिका की शोकांतिका?
गुरुवार, दि. २/ ७ /२०२०कालच आषाढी एकादशी झाली. आपल्यापैकी ब-याच जणांनी 'एकादशी आणि दुप्पट खाशी' या न्यायाला अनुसरून साबुदाणा खिचडी, बटाट्याची भाजी, दाण्याची आमटी, वरी तांदळाचा भात, भाजणीचे थालीपीठ, साबुदाणा वडा, काकडीची कोशिंबीर, श्रीखंड, खसखसची खीर, अळीवाचे वा डिंकाचे लाडू, खजुराच्या वड्या वगैरे वगैरे पदार्थांवर यथेच्छ ताव मारून 'उपवास' केला असावा. माझ्या अंदाजानुसार आपल्या महाराष्ट्रात जेव्हढ्या उपवासाच्या पदार्थांची रेलचेल आहे तेव्हढी अन्य कुठल्याही प्रदेशात नसावी. धन्य त्या घरोघरीच्या अन्नपूर्णा! ..