सालाबादप्रमाणे याही वर्षी मराठी वाङ्मय मंडळाचा उदघाटन सोहळा थाटात साजरा झाला. सोमवार, दि.२६ ऑगस्ट २०१९ रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व वक्त्या म्हणून सुप्रसिद्ध कवयित्री डाॅ सुलभा कोरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षपद डाॅ. सुरेश चंद्रात्रे यांनी भूषवले.
सुरवातीला मंचावरील मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वती व स्वामी विवेकानंद यांच्या तसबिरींना पुष्प समर्पण करण्यात आले. नंतर पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर डाॅ. सुरेश चंद्रात्रे यांनी आपले मनोगत मांडले.
आपल्या भाषणात डाॅ. सुलभा कोरे यांनी 'कविता व कवितेचा आस्वाद' हा विषय मांडला. त्यात त्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. कार्यक्रमाचा समारोप डाॅ. श्रीनिवास आठल्ये यांच्या स्वलिखित 'पुस्तके तुमची वाट बघतात!' या सुंदर कवितेने झाला.
प्रमुख पाहुण्यांचा परिचय रोहित पांगम याने करून दिला. तर आभार प्रदर्शन सायली अंबेडे हिने केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी रनाळकर हिने केले.