राष्ट्रीय शिक्षण संस्थेने, डोंबिवली परिसरातील शिक्षण प्रेमी, परंतु कुटुंबासाठी अर्थार्जन करण्याची गरज असलेल्या विद्यार्थी वर्गासाठी एक रात्र महाविद्यालय सुरू करण्याचे ठरविले. दिनांक 9 /7 /98 पासून महाविद्यालय सुरू करण्याची अनुमती मिळाली प्रत्यक्षात शैक्षणिक वर्ष 98 99 पासून हे महाविद्यालय सुरू झाले.
राष्ट्रीय शिक्षण संस्था, डोंबिवलीआणिस्वामी विवेकानंद कला व वाणिज्य रात्र महाविद्यालय, डोंबिवलीयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजितसोमवार, दि. १८ जानेवारी २०२१ व मंगळवार, दि. १९ जानेवारी २०२१अहवालराष्ट्रीय शिक्षण संस्था, डोंबिवली आणि स्वामी विवेकानंद कला व वाण
;मध्यंतरीच्या काळात संस्कृत सुभाषितांचा अभ्यास करीत असताना दानशूर व्यक्तीची उपलब्धता किती दुर्मीळ असते हे दर्शविणारे सुभाषित वाचनात आले. सुभाषितकार असे म्हणतात की,शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पण्डितः|वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा ||अर्थात् शंभरात एक शूर निपजतो, हजारात एक पंडित असतो, दहा हजारात एक वक्ता मिळतो, पण दानशूर व्यक्ती मिळणे खूपच मुश्किल आहे. का बरे असे सुभाषितकार म्हणतात? दान एव्हढी कठीण क्रिया आहे? दानाची महती एव्हढी असूनसुद्धा दानशूर व्यक्तींची समाजात वानवा असावी
सोमवार, दि. १३ /७ /२०२०मध्यंतरीच्या काळात समाजसेवकांच्या समाजसेवेबद्दल एक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यात आला. आपण कल्पनाही करू शकत नाही अशा अनेक उपेक्षित क्षेत्रात विविध व्यक्ती समाजसेवेचे व्रत घेऊन सेवा बजावण्याचे कार्य करीत आहेत. यातील ब-याचशा व्यक्ती या निःस्पृहपणे कोणत्याही प्रसिद्धीची हाव न बाळगता अत्यंत सचोटीने व प्रामाणिकपणे आपल्या कार्यावर निष्ठा ठेवून कार्य पूर्णत्वास नेत असतात. सेवा म्हणजे काय? सेवाभाव म्हणजे काय? सेवेने काय साधते? असे अनेक प्रश्न माझ्या मनात रुंजी घालत होते. त्या प्रश्नांची उकल कर
गुरुवार, दि. ९/ ७/ २०२०टवाळा आवडे विनोद' अशा शब्दांत जरी समर्थ रामदासांनी विनोद व टवाळ व्यक्ती यांचा संदर्भ जोडला असला तरी विनोदाची हेटाळणी करणे नेहमीच शक्य नाही.'. हसत खेळत जगणारी माणसे चेह-यावर कोणतेही मुखवटे चढवत नाहीत. पण चेह-यावर गांभीर्याचे भाव आणणारे तत्त्वज्ञ कुणाला आवडतात? विनोदी माणसे बुद्धिवंतांना आवडत नाहीत. प्रज्ञावंत मंडळी विनोदवीरांची थट्टा करतात. परंतु या जगात एखाद्याला रडवणे जितके सोपे आहे; तितकेच हसविणे महाकर्मकठीण! मानवी जीवनातील पर्वताएव्हढ्या दुःखाने भरडून जाताना विनोदाचा आधा
स्वामी विवेकानंद रात्र महाविद्यालय, छत्रपती भवन, आयरे रड, दत्तनगर, डों. (पू.)
0251 – 2410114, 2410115
[email protected]