एकाग्रतेकडून प्रसन्नतेकडे नेणारा मार्ग- योग

25 Jun 2021 11:53:35
   एकाग्रतेकडून प्रसन्नतेकडे नेणारा राजमार्ग-योग. 
YOG_1  H x W: 0
 
                     भारत म्हणजे पुरातन संस्कृती. या आपल्या संस्कृतीने जगाला अनेक अनुकरणीय देणग्या दिल्या आहेत. ज्या समस्त मानवी कल्याणासाठी सुयोग्य आहेत.   या सर्व अनमोल परंपरेतील एक देणगी म्हणजे योगसाधना.योग म्हणजे एकाग्रतेकडून प्रसन्नतेकडे नेणारा राजमार्ग.जी व्यक्ती या मार्गाने मार्गक्रमण करेल ती व्यक्ती नक्कीच जीवनात पूर्णत्वाचा अनुभव घेइल.
                    आपल्या राष्ट्रीय संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर,रामनगर या शाळेने २१ जून २०२१ या दिवशी उत्साहाणे योगदिन साजरा केला . शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास करून उद्याचा सक्षम नागरिक तयार करण्याचे काम आमची शाळा अनेक दशके अविरतपणे करत आहे.
                 याच सुवर्णपरंपरेतील पुढील उपक्रमात आमच्या शाळेतील इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांनी आभासी प्रणालीद्वारे सहभाग घेतला . विद्यार्थ्यांनी योग साधनेची विविध प्रात्याक्षिके सादर केली.विविध आसने ,प्राणायाम, ध्यानधारणा,सूर्यनमस्कार याची प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी सादर केली. योगसाधनेचे महत्व समजून घेतले.
      आधी केले, नंतर सांगितले या उक्तीप्रमाणे आमच्या सर्व शिक्षकांनी या उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेतला .विद्यार्थी हा अनुकरणप्रिय  असतो.शिक्षकांच्या सहभागामुळे विद्यार्थ्यांनी उत्साहाने  सहभाग घेतला. शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ. शिंदे बाई यांच्या नियोजनानुसार व मार्गदर्शनानुसार जागतिक योगदिन हा उपक्रम पार पडला.
Powered By Sangraha 9.0