नातं मायेचं, छत्र छायेचं – मातृदिन.
माझ्या अनमोल देहाची, संचिती आहेस तु.
तुझ्यासवे या देहाचे, रूप माझे जाहले.
तुझ्यामुळे या जीवनी, पहिले पाऊल टाकिले”.
शाळेत ३० ऑगस्ट २०१९ रोजी अतिशय उत्साही वातावरण होते, निमित्त होते मातृदिनाचे.आईच्या ऋणाची छोटीशी पोचपावती म्हणून शाळेत ह्या कार्यक्रमानिमित्त सर्व माता पालक आवर्जून उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांनी मातेचे यथोचित पुजन केले. आभार प्रकट केले.यावेळी वातावरणात शब्दात व्यक्त न करण्याजोगी नि:शब्द भाउकता होती.
कार्यक्रमाला सर्व माता पालक, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिंदे बाई, शिक्षक उपस्थित होते.