10 जून 1966 पासून डोंबिवली पूर्वेच्या रामनगर विभागात, सौ संध्या ताई रानडे यांच्या मालकीच्या घरातील एका खोलीत एक शाळा सुरू झाली. या शाळेचे नावही "स्वामी विवेकानंद विद्यामंदिर" असे होते. कै. मामा फाटकांच्या प्रयत्नाने रामनगर येथील राष्ट्रीय ट्रस्टच्या इमारतीत सन 1968 पासून शाळा भरू लागली होती. मे. दादाजी धाकजी आणि कंपनीचे मालक श्री. रामकृष्ण राणे यांच्या मालकीचा प्लॉट रुपये 15000 मध्ये विकत घेऊन त्या जागेवर विद्यमान " स्वामी विवेकानंद विद्यामंदिर” ,रामनगर , “गुरुगोविंद सिंग भवन” ही वास्तू उ
शाळेत शुक्रवार दि. २१/०६/२०१९ रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला.अनेक आसने योग्य शारीरिक हालचालीसह करून घेण्यात आली. मंत्रासह सूर्यनमस्कार सादरीकरण करण्यात आले.
शाळेत १४/०८/२०१९ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित देशभक्तीपर समूहगान स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. शिंदे बाई व पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ.दहितुले बाई यांनी परिक्षण केले.
शनिवार दि. १५/०६/२०१९ रोजी २०१९-२० या शेक्षणिक वर्षातील पहिला दिवस विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला.शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ रांगोळी काढण्यात आली.पताका लावण्यात आल्या.वर्ग सजावट करण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांचे ढोल- ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रामनगर प्राथमिक, गुरु गोविंदसिंग भवन, राजाजी पथ, रामनगर, डोंबिवली (पू.)
प्राथमिक - 0251-2450598
प्राथमिक - [email protected]