आनंदमेळा
शाळा म्हटली की अभ्यास आलाच. या अभ्यासातून थोडा विरंगुळा, मनोरंजन व्हावे तसेच मनोरंजनातून आर्थिक व्यवहाराचे ज्ञान करून देण्यासाठी शाळेत गुरुवार दि,२ जानेवारी २०२० रोजी 'आनंदमेळा' साजरा करण्यात आला.
या मेळाव्यात विविध खेळ, भाजी बाजार, शालेपयोगी वस्तूंच्या विक्रीचे दुकान, खाण्याच्या पदार्थांची दुकाने भरवण्यात आली. शाळेत विद्यार्थ्यांनी पालकांसोबत या मेळाव्यात सहभाग घेऊन देवाण घेवाण म्हणजे काय? रुपये,पैसे चलनांची ओळख , वजने इ. व्यवहार समजावून घेतले.पाव, अर्धा, किलो हे संबोध प्रत्यक्ष विक्रीतून त्यांना सहज समजले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भोजने मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व शिक्षक,पालक, व विद्यार्थ्यांनी हा आनंद मेळा उत्साहात साजरा केला व एक वेगळाच आनंद हा आनंदमेळा सगळ्यांना देऊन गेला.