राष्ट्रीय शिक्षण संस्था, डोंबिवली. स्वामी विवेकानदं विद्यामदिर, गोपाळनगर- माध्यमिक डोंबिवली पूर्व. "श्रावणधारा" हस्तलिखित उद्घाटन आणि काव्यवाचन कार्यक्रम

Source :    Date :23-Sep-2021
                                                                              ह्स्त्लिखित_11  
 
 
                                              राष्ट्रीय शिक्षण संस्था, डोंबिवली
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, गोपाळनगर- माध्यमिक, डोंबिवली पूर्व.
"साहित्य मंडळ- 
पुष्प ४थे २०२१-२०२२"
 
           ह्स्त्लिखित_1  
"श्रावणधारा" हस्तलिखित उद्घाटन आणि काव्यवाचन कार्यक्रम अहवाल
बुधवार, दि .०१ सप्टेंबर २०२१
स्थळ: गुगल मीटच्या लिकंद्वारे ऑनलाइन
प्रमुख पाहुणे : कविवर्य श्री. पद्माकर भावे,
          श्रावण कृष्णदशमी शके १९४३, बुधवार दि.१ सप्टेंबर २०२१ रोजी, राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, गोपाळनगर (माध्य) शाळेच्या "श्रावणधारा" हस्तलिखित काव्यसंग्रहाचा उद्घाटन सोहळा, आभासी प्रणालीद्वारे साकारण्यात आला.

ह्स्त_1  H x W: 
         मान्यवर प्रमुख पाहुणे कविवर्य पद्माकर भावे, शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सौ.विद्या कुलकर्णी बाई, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, मा. पालक-शिक्षक संघ सदस्य आणि ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून साहित्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी (virtual lamp lighting) आभासी प्रणालीद्वारे दीपप्रज्वलनाने उपक्रमशील शालेय वातावरण, चै
तन्यमय  केले.
प्रकाशमान दीपज्योतीकडे पाहतांना उपस्थितीतांच्या मनामनांमध्ये उत्साह चै
तन्य  निर्माण झाला होता.
 
ह्स्त्लिखित_2  
   सृजनांच्या सोहळ्यात नीरज बापट व नीलम खडसे या विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदन करून सरस्वती-स्तवनाने उद्घाटन सोहळ्यासाठी शुभाशीर्वाद घेतले. 
श्रावणातील ऊन सावलीच्या, विणलेल्या जाळ्यांनी, चातकाच्या मंजुळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधाने; शब्द सुमनांनी  नीलम खडसे व अर्पिता  खिल्लारे या साहित्य मंडळाच्या सदस्यांनी गीतातुन सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
 
राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत परुस्कार प्राप्त कवीवर्य सन्माननीय कवीवर्य श्री.पद्माकर केशव भावे यांचा आकर्षकपणे परिचय कु.वेदिका मांडे हिने करून दिला.

ह्स्त्लिखित_6   
वाचकांच्याही मनामनांतुन काव्यानंद ओथंबुन वहावा. धरणी मातेने पांघरलेल्या हिरव्यागार गालिच्या प्रमाणे विद्यार्थ्यांच्या मनावर साहित्याचे उत्तम संस्कार व्हावेत. मनात रुजलेले कवितेचे बीज अंकुरायला लागावे. अशा शब्दात साहित्य मंडळाच्या शिक्षक प्रमुख सौ.खरात यांनी श्रावणधारा हस्तलिखिताचे संपादकीय मनोगत व्यक्त केले.

ह्स्त्लिखित_3   
हस्तलिखिताच्या अतरंगातुन प्रत्येकाला निसर्गाच्या वातावरणात फेरफटका मारता यावा यासाठी श्रावणधारा हस्तलिखिताचे उद्घाटन साहित्य मंडळाची अध्यक्षा कु. मेघना शेलार (१०ब) हिच्या हस्ते ऑनलाइन झाले.
 
ह्स्त्लिखित_4  
'आपण त्यांच्या बरोबर श्रावणातील पावसात चिबं भिजू आणि काव्यवाचनाने आपली मनं ताजीतवानी करूया, असे सांगत मेघना शेलारने काव्य वाचनाचे सुत्रसंचालन केले.

ह्स्त्लिखित_5   
काव्य वाचनातील प्रथम तीन क्रमांक पुढील  प्रमाणे
➡️-प्रथम क्रमांक :-वेदिका मांडे (असा रंगारी श्रावण)
➡️-द्वितीय क्रमांक :-निलम खडसे (अरे अरे पावसा)
➡️-तृतीय क्रमांक :-त्रिवेणी जाधव (चिबं चिबं पावसात)
ह्स्त्लिखित_7  
 मा.मुख्याध्यापिका सौ.विद्या कुलकर्णी यांनी स्वरचित काव्याचे वाचन केले. छोट्या चित्रकारांचे कौतुक करून उत्तम मार्गदर्शन  केले.
 
ह्स्त्लिखित_8  
कवीवर्य पद्माकर भावे यांनी पावसाच्या खेळामुळे अवघ्या धरणीला आनंदाचे तसेच सुशोभित करण्याचे वरदान देणाऱ्या श्रावणाचे वर्णन करत काव्यगायन केले. काव्याचे विविध प्रकार उदा.देऊन स्पष्ट केले. जीवनात दृष्टिकोनचे महत्त्व सांगून काव्यासंबधी उत्तम मार्गदर्शन  केले.
 
ह्स्त्लिखित_9  
      आशयघन कवितांचे काव्य वाचन करून विद्यार्थ्यांना काव्यलेखनासंबंधी मार्गदर्शन करणारे कवी सन्माननीय पद्माकर भावे यांचे साहित्य मंडळाचे विद्यार्थी सदैव आपले कृतज्ञ राहूच अशा शब्दांत आभार मानले.
      श्रावणधारा हस्तलिखित प्रकाशित करण्याची परवानगी दिल्याबद्दल मा. मुख्याध्यापिका   सौ. विद्या कुलकर्णी यांचे "श्रावणधारा" हस्तलिखित उद्घाटन आणि काव्यवाचन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे व प्रमखु पाहुण्यांचे, मुख्याध्यापिकाचे, शिक्षक वंदृ व शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग, सुत्रसंचालनाचे लेखन, PPT चे सादरीकरण करून तंत्रज्ञानाची धुरा  सांभाळणाऱ्या सौ.सरला खरात आणि सर्व विद्यार्थ्यांचे  कु.नम्रता कांबळे हिने आभार मानले.
 
ह्स्त्लिखित_10  
        कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने करण्यात आला. साहित्य मंडळाच्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.आदित्य सरोदे (१०अ) याने केले. उत्कंठावर्धक सृजनशीलतेचा हा उद्घाटन सोहळा उपस्थितांना प्रेरणादायक ठरला.
अहवाल लेखन-- सौ.सरला रवींद्र खरात. (अध्यापिका)
स्वा. वि. वि.गोपाळनगर, (माध्य) डोंबिवली ( पूर्व. )