"करा योग, रहा निरोग" २१ जून २०२१ 'आंतरराष्ट्रीय योग दिन ' राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळनगर व गणेशपथ (प्राथमिक)
24 Jun 2021 14:55:31
"करा योग, रहा निरोग"
२१ जून २०२१ 'आंतरराष्ट्रीय योग दिन ' राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळनगर व गणेशपथ (प्राथमिक) इयत्ता १ ली ते ४थी च्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रात्यक्षिकांद्वारे योग दिन साजरा करून निरोगी जीवनाचे रहस्य म्हणजेच योग हा संदेश संपूर्ण जगाला दिला आहे.
भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. आताच्या घडीला संपूर्ण जगावर करोनाचे सावट असताना योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शक्य असलेल्या प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा, असे आवाहन केले जात आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे. भारताचे आदरणीय पंतप्रधानश्री.नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता.21 सप्टेंबर 2015 रोजी प्रथमच हा दिवस (Yoga Day) साजरा करण्यात आला होता. देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 27 सप्टेंबर 2014 रोजी पुढाकार घेतला होता. त्यानंतर 21 जून हा "आंतरराष्ट्रीय योग दिन" म्हणून घोषित करण्यात आला.
राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्या मंदिर गोपाळनगर व गणेशपथ (प्राथमिक) इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन योग प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले त्यासाठी शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री. सुरेश नारोळे यांनी स्वतःचे योग प्रात्यक्षिकाचे व्हिडिओ विद्यार्थ्यांना पाठवले होते. सोमवार दिनांक 21 जून 2021 रोजी सकाळी ठीक ८:३० वाजता शाळेत गुगल मीट च्या लिंक द्वारे विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिकासाठी जॉईन व्हावे अशी सूचना देण्यात आली होती.
विद्यार्थ्यांबरोबर पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनादेखील सहभागी करून घेण्यात आले श्री. सुरेश नारोळे सर यांनी विद्यार्थ्यांना सर्व सूचना आभासी प्रणालीद्वारे दिल्या व सर्वांकडून योग प्रात्यक्षिके करून घेतली. अशा रीतीने अतिशय उत्साहवर्धक वातावरणात आभासी प्रणालीद्वारे योग दिनाचे प्रात्यक्षिकांद्वारे आयोजन केले गेले .ह्या उपक्रमांतर्गत वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग दिनाची माहिती व योगाचे महत्व सांगितले. ह्या उपक्रमाचे शालेय स्तरावर, शाळा समिती अध्यक्षा सौ.सरोज कुलकर्णी व शालेय समितीच्या सर्व सदस्यांनी खूप कौतुक केले पालकांनी आपल्या पाल्यां बरोबर उपक्रमात सहभाग घेतला .सर्व पालकांचे सहकार्याबद्दल शाळेतर्फे खूप खूप आभार.