ऑनलाइन प्रवेश अर्ज (२०२०-२१)

15 Jun 2020 10:31:31
राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे
 
*स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळ नगर*, माध्यमिक ,डोंबिवली पूर्व.
 
*ऑनलाइन प्रवेश अर्ज* (२०२०-२१)
 
पालक व विद्यार्थी मित्रांनो, साधारणपणे दरवर्षी मे आणि जून महिन्यात आपण पुढील वर्षासाठी शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करतो.
 
परंतु यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे सर्व शाळा व कार्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. पूर्वी कधीही न अनुभवलेली परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
अशा वेळेस आपल्या पाल्याच्या शाळा प्रवेशाची चिंता पालकांना भेडसावणे स्वाभाविक आहे. याकरता स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळनगर माध्यमिक मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यम डोंबिवली पूर्व, ऑनलाईन प्रवेश अर्ज उपलब्ध करून देत आहे. याद्वारे इयत्ता 5 वी ते 10वी पर्यंत विविध इयत्तांमध्ये पालकांना आपल्या पाल्यासाठी प्रवेश अर्ज भरता येईल. शाळा सुरू झाल्यावर या अर्जानुसार, त्वरित पालकांशी संपर्क साधण्यात येईल.
 
याकरता स्वतंत्र लिंक देत आहोत. पालकांनी आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या पाल्यासाठी प्रवेश अर्ज भरावा.
 
मुख्याध्यापिका,
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, गोपाळ नगर, माध्यमिक ,डोंबिवली पूर्व
 
प्रवेश अर्जासाठी येथे क्लिक करा 
 
विशेष सूचना :- ऑनलाइन प्रवेश अर्ज भरल्यावर पालकांनी इतर तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यावरच पाल्याचा प्रवेश निश्चित होईल.
 
संपर्क- सौ. स्नेहल शिंदे, (मुख्याध्यापिका)
98 20 869759
0251-2410107
Powered By Sangraha 9.0