डोंबिवली पूर्वेला गोपाळ नगर भागात दिनांक 12 मे 1968 रोजी राष्ट्रीय शिक्षण संस्थेची "स्वामी विवेकानंद विद्यामंदिर", गोपाळ नगर शाखा ही शाळा प्रथम सुरू झाली 1969 सायली श्रीयुत मोकाशींच्या घरकुल या घराच्या गच्चीवर रुपये चाळीस हजार खर्च करून 5 वर्ग खोल्या बांधण्यात आल्या. याच वर्षी शाळेला शासकीय मान्यता मिळाली. येथील प्राथमिक शाळेला सन 1983 पासून शासकीय अनुदान मिळू लागले. जून 1976 पासून गोपाळ नगर येथे माध्यमिक शाळा सुरू झाली व1978 मध्ये या शाळेला शासकीय अनुदान मिळाले.