गुरुवार दि. २४ जून २०२१ वृक्षसंवर्धनाची जाणीव करून देणारी अनोखी वटपौर्णिमेनिमित्त राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, गोपाळनगर व गणेशपथ (प्राथमिक) शाळेने इयत्ता १ ली ते ७ वी च्या विद्यार्थी व पालकांसाठी ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी ठीक ११ वाजता कार्यक्रम सुरु झाला. कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी गोपाळ नगर प्राथमिक शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ.सरोजिनी महाजन यांच्याकडे होती त्यांनी सर्व पालकांना व विद्यार्थ्यांना सूचना व गुगल मिटची लिंक देऊन कार्यक्रमाला वेळत जॉईन होण्याचे सांगितले. दोन्ही शाळांच्या प्रभारी मुख्याध्यापिका मा.सौ. सुदेष्णा महाकाळ व मा. सौ.भावना राठोड ,सर्व शिक्षक, पालक व बालमित्रांचे स्वागत करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
सौ.सरोजीनी महाजन यांनी उपस्थित सर्व पालकांचे व विद्यार्थ्यांचे वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन स्वागत केले. झाडांचे महत्व सांगितले. झाडांचे विविध उपयोग सांगितले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावून त्यांचे संगोपन करणे किती आवश्यक आहे हे पटवून दिले. वृक्ष, झाड-झुडपांच मनूष्य जीवनात फार महत्व आहे. “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे” म्हणजे वृक्ष आपले मित्र. हो खरच, वृक्ष नाही तर जीवन सुद्धा नाही. सर्व सजीवांना जीवंत राहण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे ऑक्सीजन. ऑक्सीजन श्वासावाटे घेऊन आपण कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतो आज कार्बन-डाय-ऑक्साईड झाडे शोषून घेतात व शुद्ध ऑक्सिजन बाहेर टाकतात. ऑक्सिजनचे मनुष्य जीवनात किती महत्त्व आहे हे आपल्याला कोरोनाच्या काळात समजलेलेच आहे.
झाडांपासून आपणास इंधन, लाकुड, कागद, औषधी, भाजी, फळे इत्यादि सर्व मिळते.फक्त मानवालाच नाही तर सर्व वन्य जीवांकरता पण वृक्ष फार महत्वाच काम करतात. अनेक पक्षी, छोटे-छोटे जीव-जंतु आपले निवास स्थान झाडातच करतात.