स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळनगर [प्राथमिक] येथे झाले प्रवेशोत्सव उल्हासाने साजरा

Source :    Date :21-Aug-2019

 
आज प्रवेशोत्सव. शाळेचा परिसर बालगोपाळांच्या किलबिलाटाने बहरुन गेला. मुलांच्या पदस्पर्शाने पुन्हा शाळेला नवचैतन्य प्राप्त झाले.तोच आनंद ,तोच उत्साह दिसून आला.विद्यार्थ्यांचे फुललेले चेहरे,त्यांचा नवा गणवेश, नवीन दप्तर, नवी चप्पल यामुळे आनंदाला उधाण आले होते. शाळा देखील रंग दिल्यामुळे नवी दिसत होती.मा.सावंतबाई यांनी दीप प्रज्वलन करून विद्यार्थ्यांना पेन्सील,खोडरबर,वह्या व नवी पुस्तके देऊन  विद्यार्थ्यांचे स्वागत केले.