राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, गणेशपथ (पूर्व प्राथमिक ) व (प्राथमिक )तसेच गोपाळनगर (प्राथमिक )विभागाच्या पालकांसाठी सुजाण पालकत्व या विषयावर मार्गदर्शन पर शिबीराचे आयोजन.

29 Aug 2021 10:18:51
                                                                              सुजाण पालकत्व
 
                                                                     sujan palkatv_1 &nbs
           राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, गणेशपथ (पूर्व प्राथमिक ) व (प्राथमिक )तसेच गोपाळनगर, प्राथमिक विभागाच्या पालकांसाठी सुजाण पालकत्व या विषयावर मार्गदर्शन पर शिबीराचे आयोजन.

               अपत्यप्रेम ही गोष्टच मुळात विलक्षण आहे. भारतीय वैद्यकशास्त्रामध्ये एक खूप छानसा विचार आहे. ‘पुत्रवदेवैनं पालयेदातुरं भिषक्‌’ म्हणजे रुग्णाला तुमचे मूल समजून चिकित्सा करा. याचाच एक अर्थ असा आहे, की माणूस स्वतःच्या बालकाची अथवा मुलाची जेवढी काळजी घेतो, तेवढी इतर कशाचीच घेत नाही. 

            सुजाण पालकत्वामुळेच मुलाची वर्तणूक आणि सामाजिक कौशल्ये ही वृद्धिंगत होत असतात. जबाबदार पालकत्वाचे उदाहरणच जर द्यायचे झाले, तर बालकाने केलेल्या योग्य गोष्टी त्याच्या नजरेस आणून देणे आणि बालकाच्या काही कृती, म्हणजे प्रेम, आनंद, शांतता, संयम, चांगुलपणा, दयाळू वृत्ती, विनम्रता, विश्‍वासूपणा आणि स्वनियंत्रण यापैकी असणाऱ्या अथवा दिसणाऱ्या गुणांचे कौतुक करायची संधी न गमावणे. पालकांना आपल्या  पालकत्वा विषयीची जाणीव व्हावी या उद्देशाने बुधवार दिनांक २५ ऑगस्ट २०२१ रोजी सायंकाळी ठीक चार वाजता या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
 
         . सुजाण पालकत्व या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या  पूर्व प्राथमिक विभागाने केले होते. गणेशपथ पूर्व प्राथमिकच्या कार्यक्रमाच्या आयोजक शाळेच्या प्रमुख सौ. मंगल डोंगरे  यांनी त्यानुसार सर्व पालकांना पूर्व सूचना दिल्या होत्या. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सन्मानीय समुपदेशक सौ. उषा बोरसे  यांना निमंत्रित केले होते. कार्यक्रम ठीक चार वाजता सुरू झाला कार्यक्रमासाठी गणेशपथ पूर्व प्राथमिक शाळा समिती अध्यक्ष सन्मा.श्री ऐतवडे माननीय .शाळा समिती सदस्य सन्मा ॲड.सौ.माधुरी जोशी ,सन्मा.सौ.मीनल जोशी  सन्मा. सौ.जोशी, सर्व शाखांमधील पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख, गोपाळनगर, गणेशपथ शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व इयत्ता पहिली ते चौथी चे पालक उपस्थित होते. सुंदर -सुमधुर अशा संपूर्ण वंदनेने  कार्यक्रमाची सुरुवात झाली.  गोपाळनगर, गणेशपथ शाळा समिती सदस्या सन्मा. ॲड. सौ.माधुरी जोशी यांनी  कार्यक्रमाचा उद्देश प्रास्ताविकातून मांडला .त्यात त्यांनी आपल्या पाल्यां कडून अपेक्षा ठेवू नका, त्यांच्यावर कोणतेही अपेक्षांचं ओझे लादू नका व आपल्या पाल्याची दुसऱ्या पाल्याबरोबर‌ तुलना ‌करू नका असा सल्ला पालकांना दिला
 
     . कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या मार्गदर्शक समुपदेशक सन्मा. सौ.उषा बोरसे  यांनी अनेक उदाहरणांनी पालकांना आनंदी पालकत्व कसे अनुभवायचे याविषयी समुपदेशन केले पालकांशी त्यांनी संवाद साधला पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची खूप छान  उदाहरणे देऊन उत्तम मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेशपथ  (प्राथ.)शाळेच्या शिक्षिका सौ.अंकिता खैरनार यांनी केले .शाळा समितीचे अध्यक्ष सन्मा.ऐतवडे सरांनी  सर्व पालकांना आपली संस्था ही नामांकित दर्जेदार शिक्षण देणारी संस्था आहे  त्यामुळे आपल्या शाळेचा पट वाढवण्यासाठी पालकांनी अधिकाधिक सहकार्य करावे असे आवाहन केले. पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिका सौ. माने यांनी आभार मानले व शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. 
                 
ReplyForward
Powered By Sangraha 9.0