"गुरुजनांना मानवंदना, कृतज्ञतेचा सोहळा"
रोटरी क्लब तर्फे शिक्षकांना मानवंदना. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली रीजेन्सी आयोजित वीस वर्षे सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांचा कौतुक सोहळा. सोमवार दिनांक १४ जून २०२१ रोजी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली, रीजेन्सी आयोजित राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित, स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गणेशपथ (प्राथमिक) व गोपाळनगर (प्राथमिक ) शाळेतील वीस वर्षे व त्याहून अधिक काळ सेवा झालेल्या शिक्षकांच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम प्रमुख माननीय श्री. अमित श्रीकृष्ण देशपांडे आपल्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे ते स्वतः आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत व व त्यांनी हया क्लब ची नव्याने सुरुवात केली आहे . मराठी माध्यमांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजामध्ये थोडा बदलत चाललेला आहे ,त्या पार्श्वभूमीवर मराठी माध्यमातील शिक्षक हे देखील अनेक वर्षे चांगल्या पद्धतीने ज्ञानार्जनाचे चे कार्य करत आहेत व सुजाण पिढी घडवत आहेत. त्याची माहिती समाजापर्यंत व्हावी या उद्देशाने हया कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सन्मा श्री. अमित श्रीकृष्ण देशपांडे ह्यांनी सर्व गुरुजनांना नमन करून व थोडक्यात प्रस्ताविक मांडून केली. कार्यक्रमासाठी उपस्थित रोटरी क्लब ऑफ डोंबिवली रीजेन्सीच्या अध्यक्षा सन्मा. लक्ष्मी शर्मा व सदस्य सन्मा रेणू अग्रवाल , फोटोग्राफर श्री मनोज मेहता , गणेशपथ (प्राथ) च्या मुख्याध्यापिका माननीय सौ.सुदेष्णा महाकाळ , गोपाळनगर (प्राथ) मुख्याध्यापिका मान. सौ.भावना राठोड , गोपाळनगर (माध्य) शाळेच्या मुख्याध्यापिका मान. सौ. विद्या कुलकर्णी दत्तनगर (माध्य.)शाळेच्या मुख्याध्यापिका मान. सौ. सुलभा बोंडे उपस्थित होते. उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. सर्व शिक्षकांना रोटरी क्लब तर्फे भेट वस्तू व मानपत्र देण्यात आले. रोटरी क्लब डोंबिवली रीजन्सी च्या उपक्रमाचे छायाचित्रण डोंबिवलीचे नामांकित फोटोग्राफर मान. श्री.मनोज मेहता यांनी केले . मान. श्री मनोज मेहता यांना फोटोग्राफी क्षेत्रात पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नुकतेच गौरवण्यात आलेले आहे. हया उपक्रमाची दखल 'वृत्तमानस' या अंकाने, 'नवराष्ट्र' व 'पुढारी' या वृत्तपत्राने देखील घेतली व मराठी शाळांच्या विकासासाठी वृत्तपत्रांमधून फोटो व माहिती चे प्रसारण केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन गणेश पथ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुदेष्णा महाकाळ यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेशपथ शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ.अंकिता खैरनार यांनी केले.