निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे योगसाधनाराष्ट्रीय शिक्षण संस्था संचालितस्वामी विवेकानंद विद्यामंदिर गणेश पथ प्राथमिक डोंबिवली (पूर्व)

Source :    Date :24-Jun-2021
"निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली म्हणजे योगसाधना"
   
yoga day_1  H x
 
    राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर गणेशपथ प्राथमिक डोंबिवली (पूर्व) सोमवार दिनांक 21/ 6/ 2021 रोजी शाळेत सकाळी ९.०० वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन आभासी प्रणालीद्वारे साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योगाचे महत्त्व सांगण्यात आले तसेच सदृढ शरीराबरोबर सदृढ मनासाठी योग साधनेचे अनन्य साधारण महत्व आहे हे सांगण्यात आले.
 
   सर्व वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना योग साधनेचे महत्त्व आभासी प्रणालीद्वारे स्पष्ट केले. शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका ,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,सर्व विद्यार्थी आणि पालक वर्ग यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. शाळेतील सहाय्यक शिक्षक श्री.सुरेश नारोळे यांनी स्वतः तयार केलेला योगा प्रात्यक्षिकांचा व्हिडिओ विद्यार्थ्यांना पाठविण्यात आला होता. सकाळी 8.40 वाजता गुगल मीट द्वारे लिंक पाठवून इयत्ता ५ वी ते ७ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी योगा प्रात्यक्षिकांसाठी जॉईन व्हावे असे मार्गदर्शन करण्यात आले होते.
 
   श्री सुरेश नारोळे सर यांनी आभासी प्रणालीद्वारे योगासने,सूर्यनमस्कार प्राणायाम ,आणि कपालभाती अशी विविध योगा प्रात्यक्षिके करून घेतली.विद्यार्थ्यांनी केलेल्या योगा प्रात्यक्षिकांचे फोटो आणि व्हिडिओ तयार करून पाठविले होते.
 
   मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला होता.या उपक्रमाचे शालेय समितीचे सन्माननीय अध्यक्ष व सन्माननीय सदस्य यांनी कौतुक केले. आंतरराष्ट्रीय योग दिनात पालकांनी सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे शाळेकडून आभार मानण्यात आले.