स्वामी विवेकानंद विद्यामंदिर,दत्तनगर प्राथमिक शाळेत सामूहिक सूर्यनमस्कार,योग प्रात्यक्षिक कार्यक्रम व हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा
Source : Date :13-Feb-2022
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर,दत्तनगर प्राथमिक शाळेत सामूहिक सूर्यनमस्कार,योग प्रात्यक्षिक कार्यक्रम व हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा
मंगळवार दिनांक ०८/०२/२२ रोजी स्वामी विवेकानंद विद्यामंदिर,दत्तनगर प्राथमिक शाळेच्या भव्य प्रांगणात सकाळी ८.३० वाजता सामूहिक सूर्यनमस्कार व योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी व योगप्रशिक्षक मा.श्री.धनजंय भागवत आणि मा.श्री.गणेश गाढवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच संस्था पदाधिकारी मा.श्रीशास्त्री सर,शालेय समिती सदस्य मा.श्री.इनामदार सर,मा.सौ.माधवी कुलकर्णी मॅडम,मा.सौ.दीपा आपटे मॅडम,दत्तनगर पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख मा.पवार मॅडम आदी मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. अथर्वशीर्षाचे सामूहिक पठणकरून श्रीगणेशाची आराधना करण्यात आली.प्रास्ताविकातून शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ.मुणगेकर मॅडम यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. गुलाबपुष्प व तुळशीचे रोप देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
शाळेच्या प्रांगणात श्रीफळ वाढवून मशालरुपी ज्योत प्रज्वलित करून सदर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यानंतर शाळेचे पालक श्री.शिधोरे यांनी शास्त्रोक्त पद्धतीने मंत्रोच्चारण व होमहवन करून सूर्योपासना करीत सूर्यनमस्कारासाठी पवित्र सकारात्मक वातावरणाची निर्मिती केली.शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या २७४ विद्यार्थ्यांनी एककेंद्री वर्तुळ रचनेत १३ सामूहिक सूर्यनमस्कारांच्या प्रात्यक्षिकाचे अतिशय शिस्तबद्ध सादरीकरण केले.शाळेचे पालक आणि माजी विद्यार्थी यांनीदेखील सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकात सहभाग घेतला.शाळेतील विविध वयोगटातील निवडक विद्यार्थ्यांनी योगगीताच्या तालावर वैविध्यपूर्ण योगप्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
शाळेतील योगप्रशिक्षक श्री.पवार सर यांच्या तर्फे सूर्यनमस्काराचे उत्तम प्रात्यक्षिक करणा-या विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली.संस्था पदाधिकारी मा.श्री.शास्त्री सर यांनी विद्यार्थी,पालक व शिक्षकांचे कौतुक केले.प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार व योगासने यांबाबत माहिती दिली आणि उत्तम आयुरारोग्यासाठी नियमित सूर्यनमस्कार घालण्याचा सल्लाही दिला.
सहकारी शिक्षिका सौ.नयना पाटील यांनी आपल्या सुमधुर आवाजात म्हटलेल्या शांतिपाठाने सामूहिक सूर्यनमस्कार व योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाची सांगता झाली.
यानंतर पालकशिक्षक संघातर्फे मातापालकांसाठी हळदीकुंकू समारंभाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.