स्वामी विवेकानंद विद्यामंदिर,दत्तनगर प्राथमिक शाळेच्या इ.१ली ते ७वी च्या विद्यार्थ्यांनी शाळा बंद असल्याने,आपल्या घरीच दीपअमावस्या साजरी केली.आपापल्या घरात विविध प्रकारचे दिवे प्रज्वलित करून त्यांची मनोभावे पूजा केली.तसेच 'शुभम करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा... !',ॐसूर्यो ज्योतिर् ज्योति:सूर्य:स्वाहाllइ.श्लोकांचे पठण केले.आभासी प्रणालीद्वारे शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना दीपअमावस्येचे महत्त्व सांगितले.
शाळा बंद असली तरीही हा उपक्रम पालकांच्या सहकार्याने यशस्वीरित्या संपन्न झाला.शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सौ.गितांजली मुणगेकर,शाळा समितीच्या मा.अध्यक्षा डॉ.सौ.सरोज कुलकर्णी तसेच इतर सर्व मान्यवर पदाधिकारी यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.