राष्ट्रीय शिक्षण संस्था,डोंबिवली स्वामी विवेकानंद विद्यामंदिर,दत्तनगर प्राथ.शाळेत मंगळवार दि.२०/०७/२०२१ रोजी आभासी प्रणालीद्वारे आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली.

23 Jul 2021 12:22:18
 
ashadhi ekadashi_1 &                                                                                                       राष्ट्रीय शिक्षण संस्था,डोंबिवली
   स्वामी विवेकानंद विद्यामंदिर,दत्तनगर प्राथ.शाळेत मंगळवार दि.२०/०७/२०२१ रोजी आभासी प्रणालीद्वारे आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली.                 ''जावे पंढरीसी आवडी मनासी I कधी एकादशी आषाढी हो I
           तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी I त्याची चक्रपाणी वाट पाहे II
      मराठी वर्षानुसार आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षामध्ये येणारी एकादशी म्हणजे आषाढी एकादशी.या एकादशीस देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते. पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून या एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. विठ्ठलाचा नामघोष करीत अनेक वारकरी पायी पंढरपुरात दाखल होतात. पंढरपूर हे असे स्थान आहे जिथे अदृश्य भगवंतांच्या अस्तित्वाची साक्ष पटते.
         'आधी रचिली पंढरी,नंतर वैकुंठ नगरी'या संत नामदेवांच्या अभंगातील उल्लेखानुसार पंढरपुराचे महत्त्व हे अधिक आहे.सध्या कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण व उपक्रम चालूच आहेत.विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा विकास व्हावा,सामान्यज्ञान वाढावे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आभासी प्रणालीद्वारे मंगळवार दि. २०/७/२०२१ रोजी शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ.मुणगेकर बाई यांनी सहकारी शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी आषाढी एकादशी निमित्त पुढील ऑनलाईन उपक्रमांचे आयोजन केले होते.
                             इ.१ली व २री
                      संतांची वेशभूषा करणे.
                            इ.३री व ४थी
      वेशभूषा करून संतवाणी यांचे सादरीकरण करणे.
                            इ.५वी ते ७वी
     वेशभूषा करून अभंगाचे अर्थासह सादरीकरण करणे.
   इ.१ली व २री च्या विद्यार्थ्यांनी आपल्या वेशभूषेची छायाचित्रे आपल्या वर्ग शिक्षकांच्या WhatsApp वर पाठवली तसेच इ.३री ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी वेशभूषा करून संतवाणीचे व अभंगांचे अर्थासह सादरीकरण करून चित्रफिती व छायाचित्रे आपल्या वर्गशिक्षकांकडे पाठवली.त्यातील निवडक विद्यार्थ्यांची छायाचित्रे व चित्रफिती एकत्र करून प्रक्षेपित करण्याचे काम सौ.कांबळे बाई व श्री राऊत सर यासहशिक्षकांनी केले.आषाढी एकादशीच्या निमित्ताने भगवंतांच्या पायी नतमस्तक झाल्याने अहंपणा कमी होतो,मन ईश्‍वराशी एकरूप होते या अनुभवाचे ज्ञान देण्यासाठी व संतांचे महात्म्य विद्यार्थ्यांपर्यन्त पोहोचवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले गेले.
       सदर उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक शाळा समिती अध्यक्षा माननीय सौ.सरोज कुलकर्णी,सदस्य माननीय सौ.माधवी कुलकर्णी, Advocate.सौ.ललिता जोशीसौ मीरा कुलकर्णी,श्रीमती.दीपा आपटे,माननीय श्री इनामदार सर यांनी केले.

ashadhi ekadashi_1 & 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0