राष्ट्रीय शिक्षण संस्था,डोंबिवली व एम्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वा.वि.वि.दत्तनगर शाळेतील महिला पालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर
चला जपूया आरोग्य संपत्ती |
कधीही नाही येणार आपत्ती ||
या उक्ती प्रमाणे आरोग्यविषयक जनजागृती करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हा उपक्रम घेण्यात आला.कारण कुटुंबातील माता सुदृढ असेल, आरोग्य विषयक जागरूक असेल तर सारे कुटुंब देखील सशक्त असेल आणि येणाऱ्या आपत्तींना सामोरे जाण्याची ताकद कुटुंबाला मिळेल.म्हणून सर्व माता पालकांसाठी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.शाळेत दोन वर्गात सुसज्ज तपासणी कक्ष तयार करण्यात आले होते.यात आलेल्या 65 माता पालकांचे तसेच पूर्व प्राथमिक ,प्राथमिक विभागातील महिला शिक्षक वर्ग ,महिला कर्मचारी वर्ग यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात वजन ,उंची,बीपी, शुगर चेकिंग करून ,स्त्री रोग तज्ञ यांजकडून इतर तपासणी व सल्ला याचा सर्व महिला वर्गास लाभ मिळाला.एम्स हॉस्पिटलच्या स्त्री रोग तज्ञ मा.डॉक्टर श्रुती कोटांगळे यांचे व्याख्यान दुपारी 12 ते 1या वेळेत पालकांसाठी व सातवीच्या विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आले होते. त्यांनी खूप छान प्रकारे स्त्री संबंधित अनेक आजार तसेच त्याकरिता घ्यायची काळजी,आरोग्यविषयक जागरूक राहून यावर कोणती टेस्ट कोठे करावी, कोणती ट्रीटमेंट घ्यावी या विषयक मार्गदर्शन केले,पालकांच्या शंकांचे निरसन केले.या कार्यक्रमात एम्स हॉस्पिटलच्या डॉक्टर तसेच त्यांचा सहकारी वर्ग यांचे स्वागत करून त्यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सहकार्यवाह मा.श्री.उंटवाले सर,पूर्वप्राथमिक शाळा समिती अध्यक्ष मा.श्री.संजय कुलकर्णी सर,शालेय समिती अध्यक्ष मा.श्री शास्त्री सर,सदस्य मा.श्री.इनामदार सर,मा.श्री.करमरकर सर.यांनी आवर्जून शिबीरास भेट देऊन प्रोत्साहन दिले.शाळा समिती सदस्या मा.सौ.माधवी कुलकर्णी या महिला प्रतिनिधी म्हणून पूर्ण वेळ कार्यक्रमास उपस्थित होत्या.सदर कार्यक्रमाचे नियोजन पूर्व प्राथमिक दत्तनगर शाखा प्रमुख मा.सौ.रश्मी पवार,पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख मा.सौ. मुरादे,प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका मा.सौ.चौधरी यांनी केले असून,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.सर्व पालकांसाठी चहापान व्यवस्था करण्यात आली होती तसेच सर्व एम्स हॉस्पिटलच्या टीम करिता भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.कुटूंबातील महिलेचे स्वास्थ निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंब सक्षम राहते त्यासाठी राष्ट्रीय शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरातून हा हेतू बऱ्याच अंशी सफल झाला.त्याबद्दल राष्ट्रीय शिक्षण संस्था व एम्स हॉस्पिटल यांचे आभार.