ईनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली पूर्व,आयोजित online वक्तृत्व स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना नेत्रदीपकयश
31 Aug 2020 13:04:18
राष्ट्रीय शिक्षण संस्था
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक
ईनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली पूर्व,आयोजित online वक्तृत्व स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना नेत्रदीपकयश
ईनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली पूर्व तर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक विभागाच्या इयत्ता पाचवी ते सातवीच्या दहा विद्यार्थ्यांनी तर कविता गायन स्पर्धेत बारा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
वक्तृत्व स्पर्धेचे विषय होते
१) त्योंहारो का महत्व
२)असफलता सफलता की पहिली सिढी
या स्पर्धेत हिंदीत आमच्या शाळेतील
प्रथम क्रमांक-कु.राज सुरेश मोढवे-इ.७ वी
द्वितीय क्रमांक-कु.जुई संतोष कायसुकरइ.६वी
तृतीय क्रमांक-कु.साक्षी विनायक शिधोरे-इ.५वी
अशी पारितोषिके प्राप्त झाली.सदर स्पर्धेत आपल्या सादरीकरणाची व्हिडिओ फित पाठवून स्पर्धकांनी भाग घेतला.दिनांक 17 ऑगस्ट रोजी स्पर्धेचा निकाल झूम अँप वर जाहिर करण्यात आला. स्पर्धकांची बक्षिसे घरपोच पाठवण्यात येतील असे सांगण्यात आले. या स्पर्धेत कविता गायनात 200 तर वक्तृत्व स्पर्धेत 100 असे डोंबिवलीतील एकूण 300 विद्यार्थी सहभागी झाले होते.विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे वक्तृत्व स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटात प्रथम तिन्ही क्रमांक हे दत्तनगर प्राथमिक शाळेचेच आले.शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ.शैलजा चौधरी बाईंनी,शाळा समितीच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी सर्वशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्वानी सहभागी व बक्षिसप्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले.