लोकमान्यांची सांगू महती, ऑनलाईन उपक्रमांच्या जगती!स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ,दत्तनगर प्राथमिक
25 Jul 2020 14:39:36
लोकमान्यांची सांगू महती,ऑनलाईन उपक्रमांच्या जगती!
राष्ट्रीय शिक्षण संस्था
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर,दत्तनगर प्राथमिक
गुरुवार दिनांक. 23 जुलै 2020
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व जग थांबले आहे. शाळाही याला अपवाद नाही परंतु शिक्षण हीअविरत चालणारी प्रक्रिया आहे.त्यामुळे ती थांबणे खरंच अशक्य आहे.म्हणूनच आमची शाळा स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक डोंबिवली पूर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत शैक्षणिक उपक्रम यशस्वीरित्या राबवत आहे. 23जुलै हा दिवस भारतीय स्वातंत्रलढ्यातील सेनानी,राजकारणी,तत्त्वज्ञ,संपादक,लेखक,वक्ते,स्वराज्याचे आग्रही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती म्हणून साजरा केला जातो.गुरुवार दि.23जुलै 2020 रोजी आमच्या शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ.शैलजा चौधरीबाई यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने 'लोकमान्य टिळकांची जयंती' साजरी करणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
वर्गशिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना या उपक्रमाविषयी योग्य त्या सूचना व माहिती दिली. विद्यार्थ्यांनी आपापल्या घरूनच या उपक्रमाची शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे कार्यवाही केली. विद्यार्थ्यांनी अत्यंत समर्पक शब्दांत टिळकांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली. तसेच टिळकांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि त्यांचे जीवनकार्य यांना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी सदर उपक्रमाची छायाचित्रे व व्हिडिओ क्लिप व्हाट्सअँपच्या माध्यमातून वर्गशिक्षकांना पाठविल्या.या उपक्रमांतर्गत जमा झालेली विद्यार्थ्यांची छायाचित्रे व व्हिडिओ क्लिप यांचे इयत्ता 1ली ते 4थी चे एकत्रीकरण श्री.मयूर राऊत सरांनी केले व इ 5वि ते 7वीचे एकत्रीकरण सौ.गीतांजली मुणगेकरबाई यांनी केले.टिळक जयंतीचे औचित्य साधून इयत्ता 2री ची विद्यार्थिनीकु. सौम्या पड्याळव इयत्ता 7वीचे विद्यार्थीकु. रुणाली खडबडे व रोहन मुंढेयांनी लोकमान्य टिळकांचे चित्र रेखाटले. शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ.चौधरीबाई यांनी ''प्रथम वंदन तुज लोकमान्य टिळक भास्करा''हे कवी शंकर बर्वे यांचे गीत ऐकण्याची संधी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. तसेच 'लोकमान्य' या कार्यक्रमात 23जुलै रोजीच्या 'केसरी'दैनिकात प्रकाशित झालेल्या लेखाच्या अभिवाचनाची ऑडिओ क्लिप पाठवून माननीय मुख्याध्यापिकांनी सदर उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. ''शाळा बंद पण उपक्रम सुरु'' अंतर्गत राबविण्यात आलेला हा उपक्रम सन्माननीय मुख्याध्यापिका यांचे मार्गदर्शन व पूर्वनियोजन, सर्व शिक्षकांचे परिश्रम,पालकांचे सहकार्य,व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यांमुळे यशस्वी झाला.
शाळा समिती अध्यक्ष सन्माननीय श्री.शास्त्रीसर,सदस्य सन्माननीय श्री.इनामदारसर व सदस्या सन्माननीय सौ.कुलकर्णीबाई यांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले. तसेच 'शाळा बंद असली,तरीही अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना कार्यरत ठेवण्यात शिक्षकांना यश येत आहे, अशी प्रतिक्रिया शालेय समिती अध्यक्ष सन्मा. शास्त्रीसरांनी दिली,अशा प्रकारे अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात हा आनंददायी उपक्रम ऑनलाईन पद्धतीने यशस्वीरित्या संपन्न झाला.