स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक (डोंबिवली पूर्व) - ऑनलाइन प्रवेश अर्ज (२०२०-२१)

13 Jun 2020 14:21:01
राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक (डोंबिवली पूर्व)
ऑनलाइन प्रवेश अर्ज (२०२०-२१)
 
दरवर्षी साधारणपणे डिसेंबर-जानेवारी महिन्यात पुढील वर्षासाठी शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होते. मार्च महिन्यात ही प्रक्रिया गती पकडते. रोजच्या रोज शाळेत प्रवेश अर्ज मिळण्यासाठी, भरलेले अर्ज जमा करण्यासाठी, अन्य तांत्रिक बाबी पूर्ण करून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी पालकांची रीघ लागलेली असते. ही प्रक्रिया एप्रिल महिन्याच्या शेवटी शाळांचे निकाल जाहीर होईपर्यंत जोमाने सुरू असते.
 
परंतु यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र ' न भूतो ' अशी परिस्थिती निर्माण झाली आणि प्रवेश प्रक्रिया सुरळीत सुरू असतानाच शाळा बंद कराव्या लागल्या. सुरुवातीला थोड्या दिवसात सर्व सुरळीत होईल असे वाटत असतानाच आता ही बंदी अनिश्चित आहे असे वाटू लागले आहे.
 
अशा वेळेस आपल्या पाल्याच्या शाळा प्रवेशाची चिंता पालकांना भेडसावणे स्वाभाविक आहे. याकरता स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक सेमी इंग्रजी माध्यम डोंबिवली पूर्व ऑनलाईन प्रवेश अर्ज उपलब्ध करीत आहे. याद्वारे इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत विविध इयत्तांमध्ये पालकांना आपल्या पाल्यासाठी प्रवेश अर्ज भरता येईल. शाळा सुरू झाल्यावर या अर्जानुसार, त्वरित पालकांशी संपर्क साधण्यात येईल. 
याकरता स्वतंत्र लिंक देत आहोत. पालकांनी आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या पाल्यासाठी प्रवेश अर्ज भरावा.
 
मुख्याध्यापक
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक डोंबिवली पूर्व
 
प्रवेश अर्जासाठी लिंक 
विशेष सूचना:
ऑनलाइन प्रवेश अर्ज भरल्यावर पालकांनी इतर तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यावरच पाल्याचा प्रवेश निश्चित होईल.
संपर्क/ सौ.शैलजा चौधरी (मुख्याध्यापिका) 8097134172
02410116
Powered By Sangraha 9.0