"मुलगा मुलगी आहे समान दोघेही उंचावतील देशाची मान."
"बालिकादिन"
संस्थास्तरीय उपक्रम इयत्ता ६वी बालिकादिनानिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा-दि.३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाईफुले जयंती निमित्त स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक शाळेत बालिकादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या दिवशी ज्ञानज्योती सावित्रीबाईफुले यांच्या प्रतिमेचे शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ.शैलजा चौधरी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.त्यानंतर इयत्ता ५वी ते ७वी च्या काही विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या विषयी भाषण केले.श्री.पवारसर व राऊतसरांनी सावित्रीबाईंच्या जीवनविषयक प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेसाठी २५ पर्यायी प्रश्नांची निवड केली होती.५वी ते ७वी चे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरवर प्रश्न व पर्याय दाखविण्यात आले.विद्यार्थ्यांनी प्रश्नाचे योग्य योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहली.सदर उपक्रमाद्वारे सावित्रीबाई यांच्या महान कार्याची विद्यार्थ्यांना ओळख झाली.
प्रश्नमंजुषा स्पर्धेतील प्रश्न.
१) सावित्रीबाईचे पूर्ण नाव काय?
२)सावित्रीबाईंनी मुलींसाठी पहिली शाळा कोठे सुरु केली ?
३)सावित्रीबाईंच्या दत्तकमुलाचे नाव काय?
४)सावित्रीबाईंचा जन्म कोणत्या गावी झाला?
५)३ जानेवारीला कोणता दिन साजरा करतो?
असे एकूण २५ प्रश्न प्रोजेक्टरवर विद्यार्थ्यांना विचारण्यात आले.