स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दत्तनगर

12 Aug 2019 11:49:38
डोंबिवली पूर्वेच्या दत्तनगर भागात सन 1967 पासून सामाजिक कार्यकर्त्या सौ सुधाताई साठे यांच्या राहत्या घरी विद्यार्थ्यांसाठी "बालविकास मंदिर" या नावाने शाळा चालवण्यात येत होती. सन 1969 साली ही शाळा राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या परिवारातील एक घटक बनली. आता डोंबिवलीत गोपाळ नगर ,रामनगर, गणेशपथ व दत्तनगर च्या शाळेचा समावेश झाल्यामुळे राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या डोंबिवलीत चार शाळा सुरू झाल्या.

कै. डॉ. मुंशी आणि कै. मोकाशी यांच्या प्रयत्नामुळे दत्तनगर च्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेला एक सरकारी प्लॉट प्राप्त झाला. या ठिकाणी तळ मजल्याचे बांधकाम करण्यात आले. व जस जसे विद्यार्थी वाढू लागले तस तसे जवळच्या शास्त्री सभागृहात शाळेचे काही वर्ग भरवण्यात येत असत. निधी उपलब्ध झाल्यावर संस्थेने शाळेचे बांधकाम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले दत्तनगर च्या इमारतीला "छत्रपती भवन" असे नाव देण्यात आले. या शाळेच्या जडणघडणीत सुधाताई साठे यांचा सिंहाचा वाटा आहे. येथे होणारे अनेक प्रकारचे विरोध त्यावेळी त्यांनी खंबीरपणे मोडून काढले होते.
दत्तनगर ला माध्यमिक शाळा जून 1976 पासून सुरू झाली आणि 1978 मध्ये या शाळेला अनुदानही मिळू लागले.
दतनगरच्या प्राथमिक शाळेला 1983 पासून अनुदान प्राप्त होऊ लागले.
संस्थेच्या सर्व शाळांत, शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या गुणवत्ता यादीत क्रमांक मिळवण्याचा मान सर्वात आधी दत्तनगर शाळेच्या कुमारी तेजस्विनी खैराटकर हिने गुणवत्ता यादीत बाराव्या क्रमांकावर येऊन मीळवला.
Powered By Sangraha 9.0