''वार्षिक स्नेहसंमेलन''स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथ.''हम फिट तो इंडिया फिट"चा नारा

04 Dec 2019 14:53:19
                     ''हम फिट तो इंडिया फिट"
   
swami_1  H x W:
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक डोंबिवली शाखेत स्नेहसंमेलनात विविध नृत्य,योग प्रात्यक्षिकांनी जिंकली मने.     
       विद्यार्थ्यांचा ''हम फिट तो इंडिया फिट"चा नारा
 
सुदृढ,सशक्त भारत घडवण्यासाठी ''हम फिट तो इंडिया फिट"चा नारा देत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक शाखेच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात विविध नृत्य,योग,प्रात्यक्षिके करून उपस्थितांची मने जिंकली.
   शाळेच्या प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलन मंगळवार दि.३/१२/२०१९ रोजी शाळेच्या पटांगणात पार पडले.ईशस्तवनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
               प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत वृत्तपत्राचे उपसंपादक मा.श्री.अनिकेत घमंडी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात  आले.काही विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले,पुढे अहवाल वाचन,पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सौ.शैलजा चौधरी यांनी अहवाल वाचन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.नयना पाटील यांनी केले.प्रमुख पाहुणे मा.श्री.अनिकेत घमंडी सरांनी विद्यार्थ्यांशी मजेशीर शैलीत संवाद साधला.सांस्कृतिक कार्यक्रमात पुढील प्रमाणे..
1.गजानना गणराया,
2.आंबे कृपा करी,
3.मिकी अँड मिनी,
4.आकाशाची पोतडी,
5.फिट इंडिया,
6.उंबुटू उबुटू,
7.आरंभ है प्रचंड,
8.मंगळागौर,
9.जयजय कारा,
10.स्पोर्ट मेडली,
11.शिवबा मल्हारी,
12.स्वच्छता गीत
13.देशभक्ती मिक्स गाणे,
14.योगासने,
        आदि गीते व प्रात्यक्षिकांचा समावेश होता.
इयत्ता १ली ते ७वी च्या ५०० विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला होता.रंगीबेरंगी पोशाखात विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला होता.प्रत्येक गाण्यावर ''हम फिट तो इंडिया फिट"भारत माता कि जय ''वंदे मातरमच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.उत्कृष्ट स्वयंसेवक विद्यार्थी यश जाधव,विद्यार्थिनी साक्षी दिवेकर,तसेच गुणवंत विद्यार्थी म्हणून आयुष चौधरी यांचा शाळेकडून विशेष सन्मान करण्यात आला.संस्थेचे सहकार्यवाह मा.श्री.उंटवालेसर तसेच शाळा समिती अध्यक्ष मा.विद्याधर शास्त्री,सदस्य मा.शिवकुमार इनामदार,मा.श्री.देशपांडेसर सौ.माधवी कुलकर्णी.शाळेचे माजी विद्यार्थी व परिसराचे मा.नगरसेवक नितीन पाटील आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.त्यावेळी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे योग्य मूल्यांकन करण्याचे कार्य कलाशिक्षिका सौ.माधुरी घाटे,सौ.भाग्यलक्ष्मी पडसलगीकर यांनी केले.

varshik snehsamelan_1&nbsvarshik snehsamelan_2&nbs
varshik snehsamelan_3&nbsvarshik snehsamelan_4&nbs
varshik snehsamelan_5&nbs swami school_4  
swami school_3  swami school_1   
 
swami school_5  swami school_3  
swami school_2  swami school_1  swami school_4  swami school_1  
swami school_2  swami school_3   

swami_1  H x W: 
 
 
                     प्रामाणिक पालकांचा गौरव
योगेश माने(रिक्षाचालक) या पालकांना आपल्या रिक्षामध्ये एका आजीबाईंची विसरलेली ५५ हजार रुपयांची पिशवी परत केल्या बद्दल श्री.माने यांचा प्रामाणिक पालक म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सहकार्यवाह मा.श्री.प्रमोद उंटवालेसर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0