''संविधान आहे महान, सर्वांना हक्क समान''

26 Nov 2019 10:06:28
                          संविधान दिन
 
      ''संविधान आहे महान, सर्वांना हक्क समान''
     

भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान आहे. भारताचे संविधान हे हस्तलिखित आहे.पूर्वी २६ नोव्हेंबर हा दिवस आपण राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून साजरा करायचो. १९ नोव्हेंबर२०१५च्यासरकारच्या घोषणेनुसार आपण हाच दिवस भारतीय संविधान दिवस म्हणून साजरा करू लागलो.२०१५ मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीच्या सन्मानार्थ संविधान दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचे ठरवण्यात आले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबई येथील म्युझियमचे उदघाटन करताना भारताचे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हि घोषणा केली.संविधान दिवसाच्या निमित्ताने भारतभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.त्याअनुषंगाने आमच्या स्वामी विवेकांनद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक  शाळेत संविधान दिवसानिमित्त शाळेच्या प्रांगणावर घेण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रथम श्री.पवारसरांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व सांगितले व शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सौ.शैलजा चौधरीबाईंनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला.नंतर संविधानाचे सर्व विद्यार्थ्यांनी वाचन केले.
''संविधानाची कास धरू,विषमता नष्ट करू,''
''संधीची समानता संविधानाची महानता''
''संविधानावर निष्ठा हीच व्यक्तीची प्रतिष्ठा''
''विवेक पसरवू जनाजनात,संविधान जागवू मनामनात''
''सबसे प्यारा,संविधान हमारा''
''तुमचा आमचा एकच विचार,संविधानाचा करू प्रचार''
 अशा घोषणा देत परिसरात प्रभातफेरी काढून संविधानाविषयी जनजागृती केली.

 

 


 
Powered By Sangraha 9.0