वाचन प्रेरणा दिन

17 Oct 2019 20:27:34
 
 
 
 
               
''वाचन करा वाचन करा,
हाच खरा ज्ञानाचा झरा''
                                                                                                               वाचन प्रेरणा दिन 
''अपयश नावाच्या विकारासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हि जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत.''
१५ ऑक्टोबर ह्या दिवशी भारताचे माजी राष्ट्रपती व महान शास्रज्ञ डॉ.ए.पी जे.अब्दुल कलाम यांची जयंती.हा दिवस भारतात सर्वत्र ''वाचन प्रेरणा दिन ''म्हणून साजरा केला जातो.आजच्या विद्यार्थ्याला टीव्ही ,स्मार्टफोन,यांच्या जाळ्यातून बाहेर काढणे व त्यांच्यामध्ये अवांतर वाचनाची प्रेरणा निर्माण करणे या उद्देशाने आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक शाळेतही हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.सर्व प्रथम शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सौ.शैलजा चौधरीबाईंनी डॉ.कलाम.यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.माईकवरून सर्व विद्यार्थ्यांना डॉ.कलाम यांच्या महान जीवन कार्याची माहिती सांगण्यात आली.नंतर इयत्ता १ली ते ७वीच्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थी ग्रंथालयातील पुस्तकांचे वाटप करण्यात आले.सर्वानी पुस्तक वाचनात सहभाग घेतला.प्रथमसत्र परीक्षेचा कालावधी असल्यामुळे दिवाळी सुट्टी नंतर दि .१८/११/२०१९ रोजी विद्यार्थ्यांची पुस्तक परीक्षण स्पर्धा घेण्याचे निश्चित केले.या स्पर्धेच्या  माध्यमातून विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी हा हेतू आहे.''वाचाल तर वाचाल,शिकाल तर टिकाल''.उक्तीनुसार वाचनाने ज्ञान वाढीस लागते.व आपले विचार प्रगल्भ होतात.तसेच १५ ऑक्टोबर हा दिवस हॅन्ड वॉश डे म्हणूनही संपूर्ण जगभर साजरा केला जातो.हात कशा प्रकारे धुवावे याचे प्रात्यक्षिक शिक्षकांनी विद्यार्थ्यांना करून दाखवले .नंतर मुलांकडूनही हात धुण्याच्या पाच स्टेप्स करून घेण्यात आल्या. अशा प्रकारे हातधुण्याचे महत्व पटवून देण्यात आले.विद्यार्थ्यांना जीवनातील स्वच्छतेचे महत्व सांगितले. 
''पुस्तकांशी करता मैत्री,ज्ञानाची मिळते खात्री'' 

                
                                                
   वैयक्तिक स्वच्छतेची महती,रोगापासून मिळेल मुक्ती                                                                                                                                                       
            
             
 
Powered By Sangraha 9.0