शालेय परिपाठ अंतर्गत सामूहिक कवायत
कवायत म्हणजे सांघिक,शिस्तबद्ध शारीरिक हालचाल. कवायतीत एकाच प्रकारची हालचाल एकाच वेळी सर्वानी करणे.
कवायतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त,सांघिकवृत्ती व आत्मनियंत्रण या गुणांची जोपासना व वाढ होते.आमच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर प्राथमिक शाळेत दररोज सकाळी परिपाठाच्या वेळी सामूहिक प्रार्थना,प्रतिज्ञा,श्लोक,व कवायत प्रकारांचे प्रात्यक्षिक घेतले जाते.