मुलांचे सुप्तगुण विकसित करणे म्हणजे शिक्षण

15 Oct 2019 16:49:08
  मुलांचे सुप्तगुण विकसित करणे म्हणजे शिक्षण!
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर दत्तनगर पूर्वप्राथमिक विभाग येथे घेतलेल्या पालक प्रबोधन कार्यक्रमात
शिक्षणतज्ज्ञ दिलीप बेतकेकर यांचे प्रतिपादन.
मुलांसाठी मोठ्या शाळेमध्ये प्रवेश घेतला.त्यांना सर्व आवश्यक शालेय वस्तू पुरविल्या क्लासेसला पाठवले म्हणजे
शिक्षण होत नाही.शिक्षण म्हणजे मुलांच्या अंगी असलेले गुण. ते कसे विकसित होतील ? त्यासाठी पालकांनी काय केले पाहिजे? या विषयावर बोलताना छोटी छोटी उदाहरणे देऊन अत्यंत सरळ व सोप्या भाषेत  आपले विचार त्यांनी मांडले मुलांच्या सुप्त क्षमतांचा विकास होण्यासाठी लागणारी अनुकूलता घरातूनच उपलब्ध व्हावी लागते.विद्याभारती शिक्षण पद्धतीत मुलांचा शारीरिक,बौद्धिक वैचारिक क्षमता यांचा विकास कसा होईल याकडे लक्ष दिले जाते.असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रीय शिक्षण संस्था सहकार्यवाह मा.श्री.उंटवालेसर मा.सौ.भावना गवळी मा.श्री ऐतवडेसर पूर्वप्राथमिक विभाग प्रमुख सौ.कीर्ती मुरादे व दत्तनगर पूर्वप्राथमिक शाळा प्रमुख सौ.रश्मी पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
 मुलांचा शारीरिक,बौद्धिक वैचारिक क्षमतांचा विकास म्हणजे शिक्षण !    
 
Powered By Sangraha 9.0